Shukra Uday 2026: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव मानवी जीवनावर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्राला भौतिक सुख, आकर्षण, प्रेमाचा कारक ग्रह मानला जातो. शुक्र ग्रह राशी परिवर्तनासह शुक्र नक्षत्र गोचर, नक्षत्र पद गोचर, वक्री आणि अस्त, उदय देखील होतो. एका राशीत शुक्र तब्बल २६ दिवस वास करतो.
पंचांगानुसार, सध्या शुक्र मकर राशीत अस्त अवस्थेत विराजमान असून तो ०१ फेब्रुवारी २०२६ रोजी संध्याकाळी ६ वाजून २७ मिनिटांनी उदय स्थितीत येईल, ज्याचा १२ पैकी काही राशींच्या लोकांवर त्याचा विशेष प्रभाव पाहायला मिळेल.
सध्या मकर राशीमध्ये शुक्र ग्रहासह बुध, सूर्य आणि मंगळ देखील विराजमान आहेत. शिवाय ५३ दिवस अस्त स्थितीत असलेल्या शुक्राचा प्रभाव उदय स्थितीत येताच अत्यंत प्रभावी असेल.
शुक्राचा उदय ‘या’ राशींना भरपूर पैसा देणार
मेष (Mesh Rashi)
मेष राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राची उदय स्थिती अनुकूल ठरेल. हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. वैवाहिक जीवन सुखमय असेल, कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. शुभ कार्यात सहभागी व्हाल. स्पर्धा परिक्षेत मनासारखे यश प्राप्त होईल.
वृषभ (Vrushabh Rashi)
वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राची उदय स्थिती शुभ परिणाम देणारी असेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. समाजात मान-सन्मान वाढेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल.
मीन (Meen Rashi)
मीन राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राची उदय स्थिती अनुकूल ठरेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. या काळात व्यवसायात चांगली प्रगती होईल. कल्पनाशक्ती प्रबळ राहील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. मानसिक तणावातून मुक्त व्हाल, शक्य असल्यास या काळात ध्यानधारणा करा. मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल.
मकर (Makar Rashi)
शुक्राची उदय स्थिती मकर राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. नव्या गोष्टींशी जोडले जाल. मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

