Venus Uday in Mithun: ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला विशेष महत्व आहे. ज्योतिषशास्त्रात शुक्र हा शारीरिक सुख, वैवाहिक सुख, विलास, कीर्ती, कला, प्रतिभा, सौंदर्य आणि प्रणय यांचा कारक मानला जातो. शुक्र हा वृषभ आणि तूळ राशीचा स्वामी आहे आणि मीन हे त्याची उच्च राशी आहे, तर कन्या ही दुर्बल राशी आहे. शुक्राच्या शुभ प्रभावामुळे माणसाच्या आयुष्यात सुखात वाढ होते, असे म्हटले जाते. १२ जूनला शुक्राने मिथुन राशीत प्रवेश केला आहे. आता शुक्रदेवाचा ३० जून रोजी मिथुन राशीत उदय होणार आहे. यामुळे काही राशीच्या लोकांचं नशीब उजळू शकणार आहे. शुक्राच्या उदयामुळे अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या लोकांना लाभ होऊ शकतो.

‘या’ राशी मालामाल होण्याची शक्यता

वृषभ राशी

शुक्रदेवाच्या कृपेने वृषभ राशींच्या लोकांना मोठे फायदे मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभही मिळू शकतो. या कालावधीत विद्यार्थ्यांना कोणत्याही परीक्षेत यश मिळण्याची शक्यता आहे. शुक्राच्या प्रभावामुळे तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. पैशाची आवक या काळात वाढण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये तुम्हाला काही अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. वैवाहिक जीवनातील अडचणी हळूहळू दूर होऊ शकतात.

(हे ही वाचा : ४८ तासांनी बुधलक्ष्मी ‘या’ राशींचे बंद नशिबाचे दरवाजे उघडणार? बुधदेव दोन वेळा गोचर करुन तुमचे घर धन-धान्यांनी भरणार! )

कन्या राशी

कन्या राशीच्या लोकांसाठी शुक्राचे उदय स्थितीत असणे लाभदायी ठरु शकते. या काळात आर्थिक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. या राशीतील लोकांना मालमत्ता खरेदी आणि विक्रीवर नफा देखील मिळू शकतो. तुमचा व्यवसाय परदेशाशी संबंधित असेल तर तुम्हाला मोठा लाभ होऊ शकतो. नोकरी व्यवसायात घवघवीत यश मिळण्याची शक्यता आहे. अचानक मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. तुमच्या व्यवसायात आणि नोकरीतही बदल होण्याची शक्यता आहे. तसेच प्रगतीचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात. या काळात तुम्ही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.

तूळ राशी

शुक्रदेवाच्या कृपेने तूळ राशीच्या लोकांना सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात. व्यवसायाशी निगडित लोक प्रचंड यश प्राप्त करु शकतात. गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. करिअरमध्ये सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात. आर्थिक अडचणीतून जात असलेल्या लोकांनाही या कालावधीत मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना यावेळी चांगला नफा होऊ शकतो. तुम्ही काम-व्यवसायाशी संबंधित कारणांसाठी देशांतर्गत आणि परदेशातही प्रवास करू शकता. यासोबतच कौटुंबिक जीवनही चांगले असू शकते. 

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)