Shukra Vakri 2026: वैदिक ज्योतिषशास्त्रात शुक्र हा राक्षस ग्रह संपत्ती, वैभव, प्रेम, सौंदर्य, भागीदारी आणि भौतिक सुखसोयींचा घटक मानला जातो. दृक पंचांगानुार, ३ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी शुक्र देव त्याच्या स्वत:च्या राशीत म्हणजेच तूळ राशीत वक्री होऊ लागेल. शुक्र सुमारे ४२ दिवस म्हणजेच १४ नोव्हेंबर २०२६पर्यंत या अवस्थेत राहील.
ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा एखादा शुभ ग्रह वक्री होतो, तेव्हा त्याचा प्रभाव खूप तीव्र होतो. शुक्र वक्री झाल्यामुळे व्यक्तीचे प्रेमसंबंध, बजेट, सुखसोयी आणि व्यावसायिक करार यावर थेट परिणाम होतो. जरी या बदलाचा परिणाम सर्व राशींवर होत असला, तरी मात्र या ४२ दिवसांच्या कालावधीत काही ४ राशी आहेत ज्यांना खूप सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. ३ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या शुक्राच्या वक्री हालचालीमुळे कोणत्या राशींना सावधगिरी बाळगली पाहिजे ते जाणून घेऊ…
सिंह राशी
शुक्राच्या प्रतिगामी हालचालीदरम्यान तुमच्या भावंडांशी किंवा सहकाऱ्यांशी असलेल्या नेतासंबंधांत चढ-उतार येऊ शकतात. कोणताही विचार न करता कोणत्याही प्रकारची उधळपट्टी किंवा चैनीच्या वस्तूंची खरेदी टाळा. कामाच्या ठिकाणी भाषेवर संयम ठेवा, कारण आपले शब्द इतरांना त्रास देऊ शकतात.
वृश्चिक राशी
शुक्र तुमच्या बाराव्या घरावर प्रभाव करेल. त्यामुळे अचानक मोठा खर्च होऊ शकतो. कोणालाही मोठे कर्ज देणे टाळा, नाहीतर पैसे अडकू शकतात. आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्या आणि घाईघाईने कायदेशीर गोष्टीत निर्णय घेऊ नका.
मकर राशी
शुक्र मकर राशीच्या दहाव्या घरावर प्रभाव करेल, त्यामुळे नोकरी आणि व्यवसायातील कामाचा दबाव अचानक वाढू शकतो. कामाच्या ठिकाणी सिनिअर्स किंवा ग्राहकांशी झालेल्या वादांपासून दूर राहा. कोणत्याही नवीन प्रकल्पाच्या सुरूवातीला कागदपत्रे पूर्णपणे तपासून घ्या.
मीन राशी
शुक्र मीन राशीच्या आठव्या घरात वक्री झाल्याने वैवाहिक जीवनात आणि भागीदारीच्या कामात तणाव निर्माण होऊ शकतो. तुमच्या जोडीदाराशी किंवा पार्टनरशी पारदर्शकता ठेवा. जुन्या गोष्टी पुन्हा मतभेदांना कारणीभूत ठरू शकतात, त्यामुळे संयम बाळगा.
