Shukra Vakri 2026: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशीपरिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो, ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रात शुक्राला धन, संपत्ती आणि भौतिक सुखाचा कारक ग्रह मानले जाते. सध्या, धन देणारा हा ग्रह तूळ राशीत आहे. सध्या, शुक्र मार्गी गतीत गोचर करत आहे. काही दिवसांतच, शुक्र वक्री गतीत गोचर करेल. शुक्राच्या या गोचरामुळे काही राशींचे भाग्य बदलू शकते. शुक्राच्या वक्री गतीचा परिणाम मेष ते मीन राशींवर होईल. हिंदू पंचांगानुसार, शुक्र ३ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी आपली वक्री गती सुरू करेल. शुक्राचे गोचर अंदाजे ४२ दिवस चालेल.

वक्री शुक्र भाग्य बदलणार

मेष (Mesh Rashi)

मेष राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचे गोचर खूप शुभ परिणाम देणारा असेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा.

कर्क (Kark Rashi)

शुक्राचे गोचर कर्क राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. सगळीकडे चुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा.

वृश्चिक (Vruschik Rashi)

वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचे गोचर अनुकूल ठरेल. हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील.

मीन (Meen Rashi)

मीन राशीच्या लोकांच्या आयुष्यातशुक्राच्या अनुकूल गोचराचा सकारात्मक प्रभाव जाणवू शकतो. आर्थिक बाबतीत चांगल्या संधी मिळू शकतात. नोकरी-व्यवसायात नवीन प्रगतीच्या संधी निर्माण होण्याची शक्यता असून अडकलेली कामे मार्गी लागू शकतात. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनातही आनंदाचे वातावरण राहू शकते. कला, सौंदर्य, फॅशन किंवा सर्जनशील क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष फायदा होऊ शकतो.

धनु (Dhanu Rashi)

धनु राशीच्या व्यक्तींना शुक्र गोचराचा शुभ परिणाम मिळू शकतो. करिअरमध्ये नवीन संधी मिळण्याची शक्यता असून आर्थिक स्थिती सुधारण्याचे योग निर्माण होऊ शकतात. सामाजिक संपर्क वाढतील आणि महत्त्वाच्या व्यक्तींची मदत मिळू शकते. प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत सकारात्मक घडामोडी घडू शकतात. सुख-सुविधा, वाहन किंवा घराशी संबंधित इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)