Shukra Vakri 2026: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशीपरिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो, ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रात शुक्राला धन, संपत्ती आणि भौतिक सुखाचा कारक ग्रह मानले जाते. पंचांगानुसार, भौतिक सुख आणि समृद्धीसाठी जबाबदार असलेला शुक्र ग्रह वक्री होणार आहे. शुक्र ०३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी तूळ राशीत वक्री होईल. तो १४ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजून ५७ मिनिटांपर्यंत याच स्थितीत राहील. शुक्राची वक्री गती ४२ दिवस चालेल आणि त्याचा परिणाम सर्व १२ राशींवर होईल. तथापि, चार राशींना विशेष लाभ मिळतील.

वक्री शुक्र भाग्य बदलणार

वृषभ (Vrushabh Rashi)

वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राची वक्री स्थिती शुभ परिणाम देणारी असेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा.

तूळ (Tula Rashi)

शुक्राची वक्री स्थिती तूळ राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. सगळीकडे चुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा.

मकर (Makar Rashi)

मकर राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राची वक्री स्थिती अनुकूल ठरेल. हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील.

मीन (Meen Rashi)

मीन राशीच्या लोकांच्या आयुष्यात शुक्राच्या वक्री स्थितीचा सकारात्मक प्रभाव जाणवू शकतो. आर्थिक बाबतीत चांगल्या संधी मिळू शकतात. नोकरी-व्यवसायात नवीन प्रगतीच्या संधी निर्माण होण्याची शक्यता असून अडकलेली कामे मार्गी लागू शकतात. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनातही आनंदाचे वातावरण राहू शकते. कला, सौंदर्य, फॅशन किंवा सर्जनशील क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष फायदा होऊ शकतो.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)