Shukra-Varun Ashtadash Yog: ज्योतिषशास्त्रामध्ये नवग्रहांचे वर्णन केले जाते, ज्यात वरूण (नेपच्यून) या ग्रहाचा समावेश नाही. परंतु पाश्चात्य ज्योतिषशास्त्रात वरूण ग्रहाला महत्त्वपूर्ण मानले जाते. या ग्रहाचा संबंध कल्पना, भ्रम आणि रहस्य या गोष्टींशी आहे त्यामुळे या ग्रहाच्या प्रभावाने व्यक्तीच्या मनामध्ये नव्या विचारांचा जन्म होतो. तसेच ज्या व्यक्तींवर वरूण ग्रहाची विशेष कृपा असते अशा लोकांना आयुष्यात मोठ्या गोष्टी करण्याची प्रेरणा मिळते. परंतु जेव्हा वरूण ग्रहाची अशुभ दृष्टी एखाद्यावर पडते तेव्हा अशी व्यक्ती मानसिक दृष्ट्या अस्वस्थ असते. तसेच शुक्र ग्रहाला भौतिक सुखाचा कारक ग्रह म्हटले जाते. शुक्राच्या कृपेने व्यक्तीला सुंदर, आकर्षक आणि भौतिक सुख प्राप्त होतो.
पंचांगानुसार, ०५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजून ०५ मिनिटांनी शुक्र आणि वरूण एकमेकांपासून १८ डिग्रीवर स्थित असतील. ज्योतिषशास्त्रात या कोणीय अंतराला ‘अष्टादश योग’ म्हटले जाते. हा योग नक्कीच १२ पैकी काही राशींसाठी अनुकूल असेल.
‘या’ राशींचे भाग्य उजळणार
मकर (Makar Rashi)
शुक्र-वरुण ग्रहाचा अष्टादश योग तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मानसन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभकार्ये होतील. आरोग्य तक्रारी बंद होतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. प्रत्येक कामात मनासारखे यश मिळेल.
वृश्चिक (Vruschik Rashi)
शुक्र-वरुण ग्रहाचा अष्टादश योग वृश्चिक साठी लाभकारी ठरेल. या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. नवी संधी मिळेल, आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. अडकलेले पैसे परत मिळतील. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच पदोन्नतीही मिळेल. लेखन क्षेत्रातील व्यक्तींना खूप यश मिळेल. वैवाहिक जीवनात आनंदी आनंद येईल.
कुंभ (Kumbha Rashi)
कुंभ राशीच्या व्यक्तींवर शुक्र-वरूणाच्या अष्टादश योगाची विशेष कृपा होईल. या काळात तुमच्या नशीबाची साथ मिळेल. नव्या कल्पनाशक्ती जागृत होतील. तुमच्या मनातील सकारात्मक इच्छा पूर्ण होतील. धार्मिक कार्यात मन रमेल. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. या काळात भाग्याची साथ मिळेल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
