Shukraditya Rajyog 2026 : ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या युतीला विशेष महत्त्व दिले जाते. जेव्हा दोन ग्रह एकाच राशीत एकत्र येतात, तेव्हा त्याचा प्रभाव सर्व राशींवर वेगवेगळ्या प्रकारे दिसून येतो. १७ ऑक्टोबर २०२६ मध्ये सूर्य आणि शुक्र यांच्या युतीने ‘शुक्रादित्य राजयोग’ तयार होणार आहे. हा राजयोग काही राशींसाठी करिअर, आर्थिक स्थिती आणि व्यवसायाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या शुक्रादित्य राजयोगामुळे मेष राशीसह एकूण ३ राशींच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
सध्या शुक्र ग्रह तूळ राशीत विराजमान आहे. त्यानंतर १७ ऑक्टोबर २०२६, शनिवारी संध्याकाळी ७ वाजून ५७ मिनिटांनी सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करतील. सूर्याच्या या राशी परिवर्तनामुळे तूळ राशीत सूर्य आणि शुक्र यांची युती होईल. ज्योतिषीय मान्यतेनुसार, या युतीमुळेच ‘शुक्रादित्य राजयोग’ निर्माण होणार आहे. दरम्यान, ३१ ऑक्टोबरला होणारे गुरूचे गोचर विशेषत: ४ भाग्यशाली राशींसाठी लाभदायक ठरणार आहे.
मेष
शुक्रादित्य राजयोग मेष राशीसाठी करिअर आणि आर्थिक बाबतीत सकारात्मक बदल घेऊन येऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुम्ही घेतलेल्या कष्टांचे चीज होईल आणि तुमच्या प्रयत्नांना नवी ओळख मिळेल. नोकरदार वर्गाला नवीन जबाबदाऱ्यांसह पुढे जाण्याची संधी मिळू शकते. जे लोक नोकरी बदलण्याचा किंवा करिअरमध्ये नवीन पर्याय शोधण्याचा विचार करत आहेत, त्यांना चांगल्या संधी चालून येतील. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील आणि अडकलेली कामे मार्गी लागल्याने आर्थिक लाभ होईल. व्यापाऱ्यांना भागीदारीच्या व्यवसायात फायदा होऊ शकतो. तसेच जुन्या ओळखींचा वापर करून नवीन व्यावसायिक संधी उपलब्ध होऊ शकतात.
कर्क
सूर्य-शुक्र यांची ही युती कर्क राशीच्या लोकांसाठी कौटुंबिक आयुष्य आणि सुख-सोयींच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकते. कुटुंबाशी संबंधित तुमच्या इच्छा पूर्ण होण्याचे योग आहेत. घरातील सदस्यांशी असलेले संबंध अधिक दृढ होतील, ज्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहील. नोकरदार व्यक्तींना त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल. व्यावसायिकांना नवीन प्रकल्पांमध्ये यश मिळेल आणि उत्पन्न वाढवण्याच्या उत्तम संधी मिळतील.
तूळ
सूर्य आणि शुक्र यांची ही युती तूळ राशीतच होत आहे, त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी हा योग अतिशय खास मानला जात आहे. कार्यक्षेत्रात नवीन यश संपादन करण्याच्या अनेक संधी मिळतील. नोकरीमध्ये नवीन जबाबदारी किंवा एखादा महत्त्वाचा प्रोजेक्ट मिळू शकतो. व्यापाऱ्यांना नवीन लोकांशी संपर्क साधण्याची आणि व्यवसायाचा विस्तार करण्याची संधी मिळेल. समाजात आणि कार्यक्षेत्रात तुमचा मानसन्मान वाढेल, तसेच आत्मविश्वासही उंचावेल. मात्र, हे यश टिकवून ठेवण्यासाठी सातत्यपूर्ण मेहनत आणि योग्य निर्णय घेणे आवश्यक ठरेल.
(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)
