scorecardresearch

२ महिन्यांनी ‘या’ राशी होणार श्रीमंत? २०२३ चे पाहिले सूर्यग्रहण मिळवून देईल प्रचंड धनलाभाची संधी

Surya grahan 2023 Date: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहण २० एप्रिल रोजी होणार आहे. यामुळे ३ राशीच्या लोकांना धन आणि प्रगतीचे योग होत आहेत.

solar eclipse 2023
फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम

Surya grahan 2023 Date: ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य आणि चंद्रग्रहण वेळोवेळी होते. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर दिसून येतो. २० एप्रिलला वर्षातील पहिले सूर्यग्रहण होणार आहे. हे ग्रहण भारतीय वेळेनुसार ०७:०३ पासून सुरू होईल आणि दुपारी १२:२८ पर्यंत चालेल. हे ग्रहण दक्षिण पूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया, हिंदी महासागर आणि अंटार्क्टिकासह अनेक देशांमध्ये पाहता येईल. त्याचबरोबर या ग्रहणाचा प्रभाव भारतात दिसणार नाही. त्यामुळे सुतकही वैध ठरणार नाही. पण त्याचा प्रभाव सर्व राशींवर नक्कीच दिसून येईल. परंतु अशा ३ राशी आहेत, ज्यांना यावेळी धनलाभाची शक्यता दिसत आहे.. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

वृषभ राशी

२०२३ वर्षाचे पाहिले सूर्यग्रहण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यावेळी तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. यासोबत नोकरी करत असलेल्या लोकांना यावेळी वेतनवाढ आणि पदोन्नती होऊ शकते. तसेच, हे संक्रमण आर्थिक बाबतीत तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहे. या काळात तुमची आर्थिक स्थिती खूप चांगली राहील. त्याचबरोबर जोडीदारासोबतचे संबंध चांगले राहतील. तसेच यावेळी तुम्हाला सर्व सुखे मिळू शकतात.

मिथुन राशी

मिथुन राशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहण शुभ ठरू शकते . यावेळी तुम्हाला कोर्ट केसेसमध्ये यश मिळू शकते. यासोबतच राजकारणाशी संबंधित असलेल्यांना काही पद मिळू शकते. तसंच याकाळात तुम्हाला काही नवीन लोकांना भेटण्याची संधी मिळेल. तसेच, यावेळी तुम्ही कर्ज घेतलेले पैसे परत मिळवू शकता. तसंच याकाळात तुम्ही एखादे वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता.

(हे ही वाचा: हंस आणि मालव्य राजयोग बनल्याने ‘या’ राशींचे नशीब चमकणार? गुरू-शुक्र वर्षभर देऊ शकतात प्रचंड पैसा)

धनु राशी

धनु राशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहण फायदेशीर ठरू शकते. यावेळी तुमचा आत्मविश्वास वाढेल. यासोबतच नोकरदार लोकांना अनेक संधी मिळू शकतात. जे व्यावसायिक आहेत, त्यांना नवीन ऑर्डरमधून चांगला नफा मिळू शकतो. त्याच वेळी, तुम्हाला नशिबाची साथ मिळू शकते. यासोबतच तुम्हाला याकाळात चांगली बातमी मिळू शकते. यासोबतच तुम्हाला शनीच्या साडेसतीपासूनही मुक्ती मिळाली आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल.

(वरील बातमी महिती आणि गृहितके यांवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2023 at 19:43 IST