Aajche Rashi Bhavishya 13 July 2026 In Marathi : आज १३ जुलै २०२६ रोजी निज जेष्ठ महिन्यातील चतुर्दशी तिथी असणार आहे. आज आर्द्रा नक्षत्र जुळून येईल, त्याचबरोबर ध्रुव योग जुळून येत आहेत. राहू काळ ७ वाजून १७ मिनिटांनी सुरु होईल ते ९ वाजून ०० मिनिटांपर्यंत असणार आहे. त्याचबरोबर अभिजित मुहूर्त १२ वाजून ०२ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून ५० मिनिटांपर्यंत असणार आहे. आठवड्याचा पहिला दिवस १२ राशींना कसा जाणार याबद्दल जाणून घेऊयात…
दैनिक पंचांग व राशिभविष्य, १३ जुलै २०२६ (Horoscope Today 13 July 2026 In Marathi)
आजचे मेष राशीचे राशिभविष्य (Aries Daily Horoscope In Marathi)
मित्रांशी मनमोकळ्या गप्पा माराल. छंद जोपासायला वेळ काढाल. आवडत्या साहित्यात रमून जाल. कौटुंबिक सौख्याला अधिक प्राधान्य द्याल.
आजचे वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Daily Horoscope In Marathi)
स्वछंदीपणे दिवस घालवाल. आपल्या आजच्या सर्व इच्छा पूर्ण करून घ्याल. बाहेरील परिस्थितीचा अंदाज घेऊन खरेदी कराल. घरातील गोष्टींसाठी वेळ द्यावा. समोरील प्रत्येक गोष्टीत रमून जाल.
आजचे मिथुन राशीचे राशिभविष्य (Gemini Daily Horoscope In Marathi)
घरगुती जबाबदारी उत्तमरीत्या पेलाल. जवळचा प्रवास सुखकर होईल. काही खर्च अनाठायी होऊ शकतात. कामात भावंडे सहकार्य करतील. केलेल्या कष्टाचे समाधान मिळेल.
आजचे कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Daily Horoscope In Marathi)
कौटुंबिक गोष्टीत अधिक वेळ जाईल. एखाद्या क्षुल्लक गोष्टीसाठी अडून राहू नका. वयस्कर व्यक्तींचा मान राखाल. पैशाचा अपव्यय टाळावा. खोट्या गोष्टींना भुलू नका.
आजचे सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Daily Horoscope In Marathi)
दिवस आपल्या मनाप्रमाणे व्यतीत करावा. आवडत्या गोष्टीत अधिक रमून जाल. कमीपणा घ्यायला घाबरू नका. मानापमानाच्या प्रसंगातून जावे लागू शकते. नवीन मित्र जोडले जातील.
आजचे कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Daily Horoscope In Marathi)
विचारांच्या गर्दीत भरकटू नका. कामाची योग्य दिशा ठरवा. कल्पनेत रमून जाऊ नका. कृतीला अधिक महत्त्व द्यावे. बोलतांना तारतम्य बाळगा.
आजचे तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Daily Horoscope In Marathi)
चांगला व्यावसायिक लाभ होईल. आपली आजची आर्थिक गरज पूर्ण होईल. मनातील इच्छा पूर्ण होईल. अपेक्षित लाभाने समाधान मिळेल. व्यावसायिक दर्जा सुधारेल.
आजचे वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope In Marathi)
नोकरीच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. कर्तुत्वाला वाव देता येईल. वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. व्यापारी वर्गाला नवीन धोरण आखता येईल. सन्मानाने भारावून जाल.
आजचे धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope In Marathi)
तरुणांचे नवीन विचार जाणून घ्या. नातेवाईकांची नाराजी दूर करावी लागेल. दैनंदिन कामात थोडा बदल करून पाहावा. सबुरीच्या मार्गाने समोरील प्रश्न हाताळा. आईचे उत्तम सहकार्य मिळेल.
आजचे मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope In Marathi)
जोडीदाराची प्राप्ती वाढेल. पण त्याबरोबरच एकमेकांना समजून घ्यावे लागेल. वैचारिक मतभेदाला बाजूला ठेवावे. काम आणि वेळ यांचा योग्य मेळ घालावा. अचानक धनलाभाची शक्यता.
आजचे कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope In Marathi)
अति आवश्यक असेल तरच बाहेर पडावे. जोडीदाराचा वरचष्मा राहील. भागीदारीत मतभेद संभवतात. संपर्कातील लोकांशी घनिष्ठता वाढेल. घरगुती वातावरण प्रसन्न राहील.
आजचे मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Daily Horoscope In Marathi)
आततायीपणे वागून चालणार नाही. कामातून समाधान लाभेल. हाताखालील लोकांचे उत्तम सहकार्य मिळेल. मुलांच्या वागण्याचा अचंबा वाटेल. हातातील कलागुण विकसित करावेत.
