Rahu Gochar: स्पष्ट राहूचे शतभिषा नक्षत्राच्या चौथ्या पद गोचर पुढच्या महिन्यात म्हणजे २ डिसेंबर २०२५, मंगळवार रात्री २:११ वाजता होईल. सध्या स्पष्ट राहू पूर्वभाद्रपदा नक्षत्राच्या पहिल्या चरणात आहे. स्पष्ट राहूचं गोचर म्हणजे राहू आपली पूर्ण ताकद वापरून सर्व राशींवर परिणाम करेल.

३ राशींना अचानक आर्थिक लाभ

स्पष्ट राहूने शतभिषा नक्षत्राच्या चौथ्या चरणात गोचर केल्याने ३ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो आणि त्यांच्या सर्व कामांमध्ये यश मिळू शकते. चला जाणून घेऊ या त्या 3 राशी कोणत्या आहेत ज्यांना विशेष फायदा होऊ शकतो.

मिथुन राशी (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी राहूचा शतभिषा नक्षत्रातील पद गोचर शुभ आणि फलदायी ठरू शकतो. अनेक कामांमध्ये यश मिळू शकते. व्यापाऱ्यांसाठी हा काळ मोठा नफा देणारा असेल. अचानक करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग खुले होतील. आर्थिक स्थैर्य येईल आणि मनातील गोंधळ दूर होईल. समाजात त्यांचा प्रभाव वाढेल.

कर्क राशी (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी राहूचा शतभिषा नक्षत्राच्या चौथ्या चरणातील गोचर शुभ परिणाम देऊ शकतो. त्यांच्या नशिबात चमक येईल आणि अडकलेली कामे पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल. नोकरीत बढतीचे मार्ग खुले होतील आणि प्रतिमा सुधारेल. नवीन योजना सुरू करण्याची संधी मिळेल. जातकांना चांगली झोप मिळेल.

मकर राशी (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी राहूचा शतभिषा नक्षत्राच्या चौथ्या चरणातील गोचर आर्थिक बाबतीत खूप शुभ ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी अनपेक्षित यश मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांना अचानक मोठं पद मिळू शकतं. व्यवसाय करणारे लोक मोठी गुंतवणूक करू शकतील. घरी जुने मित्र येऊ शकतात. मानसिकदृष्ट्या जातक शांत राहतील.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)