Budhaditya Rajyog 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह वेळोवेळी राशिबदल करीत असतो. अनेकदा दोन ग्रहांच्या एका राशीतील परिवर्तनामुळे राजयोग तयार होतो; ज्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रीतीने चांगला-वाईट परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांवर होतो. त्यात ग्रहांचा राजकुमार असलेल्या बुधाने २९ ऑक्टोबरला वृश्चिक राशीत प्रवेश केला. त्यानंतर आता १७ नोव्हेंबरला ग्रहांचा राजा म्हटला जाणारा सूर्यदेवाने वृश्चिक राशीत प्रवेश केला आहे, या दोन ग्रहांच्या एकाच राशीतील संयोगामुळे आता बुधादित्य राजयोग तयार होत आहे. अशा स्थितीत या राजयोगाचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल; पण अशा तीन राशी आहेत की, ज्यांना यावेळी आर्थिक फायदा होऊ शकतो. त्यांना समाजात सन्मान आणि प्रतिष्ठादेखील मिळू शकते. चला तर मग जाणून घेऊ या भाग्यशाली राशींविषयी…

बुधादित्य राजयोगामुळे ‘या’ राशींच्या लोकांना मिळणार पैसाच पैसा?

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

वृश्चिक

बुधादित्य राजयोग वृश्चिक राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. तुम्हाला समाजात एक मान-सन्मान आणि प्रतिष्ठा मिळू शकते. ज्यांना अद्याप चांगला जोडीदार मिळू शकला नाही, त्यांच्यासाठी या महिन्यात लग्नाच्या प्रस्तावासंदर्भात आनंदाची बातमी मिळू शकते. ही बातमी तुमच्या आयुष्यात नवीन आनंद घेऊन येईल. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये पुढे जाण्याच्या उत्तम संधी मिळतील. कौटुंबिक संबंध अधिक चांगले होतील. जीवनाच्या जोडीदाराबरोबरचे नातेही घट्ट होईल. भागीदारीच्या कामातूनही तुम्हाला लाभ मिळू शकतो.

कर्क

बुधादित्य राजयोगाची निर्मिती कर्क राशीसाठी अनुकूल ठरू शकते. या काळात तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. तसेच उत्पन्नात प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. नोकरीत पगारवाढीसह पदोन्नतीचीही संधी मिळेल. बॉस आणि अधिकारी तुमच्यावर खूश राहतील. नोकरीच्या ठिकाणी मान-सन्मान मिळेल. जर तुमचे प्रेमसंबंध चालू असतील, तर तुम्हाला त्यात यश मिळू शकते. विवाहित लोकांना मुले होण्याची इच्छा असली, तर त्यांना संततीप्राप्ती होऊ शकते.

हेही वाचा – १६ नोव्हेंबरपासून ‘या’ राशींवर भाग्यलक्ष्मीची कृपादृष्टी; सूर्य-शुक्र एकमेकांसमोर येताच मिळेल अपार धन अन् समृद्धी

मकर

बुधादित्य राजयोगाची निर्मिती मकर राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकते. या काळात नोकरी आणि व्यवसायातील प्रगतीमुळे तुमचे उत्पन्न वाढेल. तसेच, आपण पैशाच्या नवीन स्रोतांद्वारे पैसे कमविण्यात यशस्वी व्हाल. त्याच वेळी तुम्हाला व्यवसायात पैसे कमविण्याच्या चांगल्या संधी मिळतील. तुमची संपत्ती वाढेल. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करीत असाल, तर हा काळ अधिक शुभ आहे. तुम्हाला त्यात यश मिळेल.

(टीप- सदर लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader