१६ जुलै रोजी सूर्याची राशी बदलली आहे. त्यामुळे आता सूर्य आणि शनि समोरासमोर आले असून ते १७ ऑगस्टपर्यंत या स्थितीत राहतील. दरम्यान, या दोन ग्रहांचा संबंध तयार होत आहे. सूर्य आणि शनि हे एकमेकांचे शत्रू असल्याने ज्योतिषशास्त्रात या स्थितीला अशुभ मानण्यात आले आहे. या दोन ग्रहांचे एकमेकांसमोर येणे हे जग आणि अनेक राशींसाठी अशुभ राहील.

सूर्य कर्क राशीत आणि शनि मकर राशीत आहे. हे दोन्ही ग्रह एकमेकांसमोर असल्याने संसप्तक योग तयार होत आहे. शनिदेव प्रतिगामी, म्हणजे उलट गतीने चालणार आहेत. शनीची प्रतिगामी स्थिती अशुभ राहील. त्यामुळे लोकांमध्ये आपसात वाद वाढतील आणि मतभेद होतील. या दोन ग्रहांमुळे पिता-पुत्राचे नातेही बिघडू शकते. या अशुभ ग्रहस्थितीमुळे लोकांना यश मिळण्यास विलंब होईल.

water bodies, Tadoba,
ताडोबातील वाघांना आवडे नैसर्गिक पाणवठे, रखरखत्या उन्हापासून बचावासाठी….
guru asta 2024
१४ दिवसांनी गुरु होणार अस्त! ‘या’ राशींच्या नशिबाचं टाळं उघडणार; नोकरीपासून प्रेमापर्यंत प्रत्येक कामात मिळू शकते यश
Stray animals suffering from dehydration due to heat 316 complaints in six days in Mumbai and Thane
उष्णतेमुळे भटक्या प्राण्यांना निर्जलीकरणाचा त्रास, मुंबई, ठाण्यामध्ये सहा दिवसांत ३१६ तक्रारी
Budh Rahu Yuti 2024
१८ वर्षांनी एप्रिलमध्ये २ ग्रहांची महायुती; ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार सुख-समृद्धी? कोणाला मिळणार भरपूर पैसा?

कधी आहे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार? जाणून घ्या उपासनेची योग्य विधी

या अशुभ योगामुळे देशातील जनता आणि प्रशासन यांच्यातील अविश्वास वाढण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या देशांमधील तणाव वाढू शकतो. देशातील जनता असमाधानी असल्याने शेजारी राष्ट्रांशी वाद होऊ शकतात. अर्थव्यवस्थेत चढ-उतार असतील. देशाच्या उत्तर आणि दक्षिण भागात आजार वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर देशातील एका मोठ्या व्यक्तिमत्वाच्या निधनाचे योगही तयार होत आहेत. यासोबतच नैसर्गिक आपत्ती म्हणजे पूर, भूकंप, चक्रीवादळ किंवा जाळपोळ होऊ शकते. देशातील लोकांमध्ये रोग आणि आपसी विवादांची परिस्थिती असू शकते. लोकांच्या आरोग्याबाबत देश-विदेशात नवीन समस्या उद्भवू शकतात.

सूर्य आणि शनीच्या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी शनिदेवाची पूजा करण्याचा नियम शास्त्रात सांगण्यात आला आहे. त्यामुळे श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी शनिदेवाची पूजा करावी. त्याचबरोबर प्रदोष म्हणजेच त्रयोदशी तिथीच्या संयोगाने केलेली पूजा शनिदेवाच्या अशुभ प्रभावामुळे होणाऱ्या त्रासांपासून मुक्ती देते. ज्यांना शनिची महादशा, साडेसती आणि धैय्याचा त्रास आहे त्यांच्यासाठी शनिवार आणि प्रदोष तिथी खूप खास आहेत. पहिला प्रदोष व्रत २५ जुलै आणि दुसरा ८ ऑगस्ट रोजी होणार आहे.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)