सूर्य देवाने केला आपल्या प्रिय राशीत प्रवेश; ‘या’ ३ राशींना मिळू शकतो अमाप पैसा आणि पद- प्रतिष्ठा

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य ग्रहाने स्वतःच्या राशीत म्हणजेच सिंह राशीत प्रवेश केला आहे. सूर्याचे हे संक्रमण ३ राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते.

सूर्य देवाने केला आपल्या प्रिय राशीत प्रवेश; ‘या’ ३ राशींना मिळू शकतो अमाप पैसा आणि पद- प्रतिष्ठा
सूर्य देवाने केला आपल्या प्रिय राशीत प्रवेश(फोटो: संग्रहित फोटो)

Surya Transit In Leo: ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एखादा ग्रह संक्रमण करतो तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर होतो. १७ ऑगस्ट रोजी सूर्य ग्रह स्वतःच्या राशीत म्हणजेच सिंह राशीत प्रवेश करणार आहे. ज्याचा परिणाम सर्व राशींवर दिसून येईल. परंतु अशा ३ राशी आहेत, ज्यांना यावेळी प्रचंड संपत्ती आणि प्रगतीचा योग मिळत आहे. चला जाणून घेऊया या राशींबद्दल..

कर्क राशी

सूर्य ग्रहाचे संक्रमणाम तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण सूर्य हा ग्रह तुमच्या राशीतून दुस-या ठिकाणी संचारला आहे. जे धन आणि वाणीचे स्थान मानले जाते. त्यामुळे या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता दिसतेय. तसेच तुमचे आधीपासून कुठेतरी अडकलेले पैसे असतील तर ते तुम्हाला यावेळी मिळू शकतात. तसेच, या काळात तुम्ही आर्थिकदृष्ट्या खूप मजबूत असाल. या काळात तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते आणि नोकरीमध्ये इच्छित ठिकाणी बदली होण्याची देखील शक्यता आहे. दुसरीकडे, जर तुम्ही एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर हा काळ तुमच्यासाठी शुभ असून तुम्ही यावेळी चांगला नफा कमवू शकता.

( हे ही वाचा: मंगळ संक्रमणासोबत संपला महाविनाशक अंगारक योग! ‘या’ राशीच्या लोकांसाठी सुरू होतील ‘अच्छे दिन’)

तूळ राशी

सूर्य ग्रहाने सिंह राशीत राशी प्रवेश केल्याने व्यवसायात चांगली प्रगती दिसून येईल. कारण तुमच्या राशीतून सूर्य अकराव्या भावात प्रवेश करत आहे, जो उत्पन्न आणि लाभाचे घर मानला जातो. त्यामुळे या काळात तुमचे उत्पन्न भरपूर वाढू शकते. तसेच, तुम्ही उत्पन्नाच्या नवीन स्त्रोतांद्वारे पैसे कमविण्यात यशस्वी व्हाल. त्याच वेळी व्यवसायात अचानक लाभ होऊ शकतो. तसंच जर तुम्ही एखादी मालमत्ता किंवा वाहने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हा काळ तुमच्यासाठी शुभ आहे. तसेच, जर तुमचा व्यवसाय परदेशाशी संबंधित असेल तर तुम्ही चांगली कमाई करू शकता.

वृश्चिक राशी

सूर्य ग्रहाचे संक्रमण तुमच्यासाठी खूप शुभ सिद्ध होऊ शकते. कारण तुमच्या राशीच्या दहाव्या भावात सूर्य ग्रहाचे भ्रमण झाले आहे. जे कार्यक्षेत्र आणि नोकरीचे मूल्य मानले जाते. त्यामुळे या काळात तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच, जर तुम्ही नोकरी असाल तर तुम्हाला यावेळी प्रमोशन मिळण्याची देखील शक्यता आहे. त्याच वेळी, या काळात तुमची कार्यशैली देखील सुधारेल, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून प्रशंसा देखील मिळू शकते. त्याचबरोबर तुम्हाला कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळू शकते. यावेळी तुम्हाला स्त्रीच्या माध्यमातून पैसे मिळू शकतात.

(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Horoscope Today : आजचं राशीभविष्य, बुधवार १७ ऑगस्ट २०२२
फोटो गॅलरी