वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार नवग्रह राशींमध्ये तसेच २७ नक्षत्रांमध्ये प्रवेश करतात. प्रत्येक नक्षत्रात प्रवेश केल्याचे फळ वेगवेगळे मिळते. अशातच आता ग्रहांचा राजा सूर्य देवाने पुष्य नक्षत्रात प्रवेश केला आहे. या नक्षत्राचे गोचर अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. २० जुलै २०२३ रोजी सूर्याने संध्याकाळी ५.०८ वाजता पुष्य नक्षत्रात प्रवेश केला आहे. पुष्य नक्षत्राला २७ नक्षत्रांपैकी आठवे नक्षत्र म्हणतात. या नक्षत्रावर बृहस्पति, गुरू आणि शनि यांचे अधिपत्य आहे. अशा स्थितीत हे नक्षत्र अनेक राशींसाठी खास असू शकते, तर काही राशींनी थोडी काळजी घेणे गरजेच आहे. चला जाणून घेऊया सूर्य पुष्य नक्षत्रात प्रवेश केल्याने कोणत्या राशींना विशेष लाभ होऊ शकतो.

मेष –

मेष राशीत सूर्य पुष्य नक्षत्रात गोचर करून चौथ्या स्थानी राहतील. अशा स्थितीत या राशीच्या लोकांवर सूर्यासह गुरूची विशेष कृपा राहील. घरात सुख-शांती राहिल्यास घरगुती संकटातून मुक्ती मिळू शकते. दीर्घकाळ रखडलेले काम सुरू होऊ शकता. तसेच अचानक आर्थिक लाभासोबतच व्यवसायातही नफा होण्याची दाट शक्यता आहे. समाजात तुमचा मान-सन्मान वाढू शकतो.

मिथुन –

मिथुन राशीत सूर्य पुष्य नक्षत्रात गोचर करुन दुसऱ्या स्थानी विराजमान होईल. ज्यामुळे मिथुन राशीच्या लोकांना त्यांच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळू शकते. त्यांना घरच्यांचा पूर्ण पाठिंबा मिळू शकतो. व्यवसायातही अचानक आर्थिक लाभ मिळू होण्याची शक्यता आहे. तसेच या काळात केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते.

हेही वाचा- शक्तीशाली ‘त्रिग्रही योग’ बनल्याने ‘या’ राशींचे सुरू होणार ‘अच्छे दिन’? बुध आणि सूर्यदेवाच्या कृपेने प्रचंड पैसा मिळण्याची शक्यता

कर्क –

कर्क राशीमध्ये सूर्य नक्षत्रात प्रवेश केल्यानंतर पहिल्या स्थानी राहणार आहे. तर या काळात सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लोकांना यश मिळू शकतो. सरकार आणि राजकारण्यांना या काळात लाभ होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वासात बदल होईल, ज्यामुळे तुम्ही मोठा निर्णय घेऊ शकता.

धनु –

धनु राशीमध्ये सूर्य आठव्या स्थानी असेल. ज्यामुळे या राशीच्या लोकांना कौटुंबिक संपत्ती मिळू शकते. आर्थिक स्थिती मजबूत असू शकते. अनावश्यक खर्चालाही आळा बसण्याची शक्यता आहे. मित्र किंवा कुटुंबासह कुठेतरी जाण्याचा प्लॅन करु शकता.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)