Sun Number News: अंकशास्त्रांमध्ये अंकांना विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक ग्रहाची एक खास राशी असते, तसेच अंकशास्त्रामध्ये प्रत्येक ग्रहाचा एक खास अंक असतो. प्रत्येक ग्रहाचा वेगवेगळा अंक असतो. जो अंक सूर्याला प्रिय असतो, त्यावर सूर्यदेवाची विशेष कृपा दिसून येते. जाणून घेऊ सूर्याचा अंक कोणता किंवा कोणता मुलांक सूर्याला प्रिय असतो?
सूर्याचा प्रिय अंक कोणता ?
अंक १ हा ग्रहांचे राजा सूर्य देवाचा प्रिय मूलांक मानला जातो. ज्या लोकांची जन्मतारीख १, १०. १९ आणि २८ असते, त्या तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक १ असतो. मूलांक १ ला सूर्याचे प्रतीक मानले जाते. हा मूळ अंक मानला जातो ज्यापासून सर्व अंक निर्माण करतात. सर्व अंकांचा आधार १ आहे. मूलांक १ हा सर्वात पावरफूल अंक मानला जातो. या लोकांच्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी घडतात. त्यांना एखादी गोष्ट मिळवण्यासाठी फार मेहनत करावी लागत नाही. त्यांना त्या सहज मिळतात.
धाडसी आणि पराक्रमी असतात हे लोक
१ अंकावर सूर्याचा अधिकार असल्याने व्यक्ती तेजस्वी होतो तसेच धाडसी, वीर, पराक्रमी होतो. त्यांनी जर एखादी गोष्ट करण्याची ठरवली तर ते पूर्ण करण्यासाठी ते वाट्टेल ते प्रयत्न करतात आणि पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. त्यांना नवनवीन आव्हाने स्वीकारायला खूप आवडतात आणि त्या आव्हानांना ते सामोरे सुद्धा जातात.
म्हणून यांना राजासारखे आयुष्य जगायला आवडते
ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्याला ग्रहांचा राजा मानला जाते त्यामुळे मूलांक १ असलेल्या लोकांना सुद्धा राजासारखे आयुष्य जगायला आवडते. त्यांच्या चांगल्या काळात ते सूर्यासारखे चमकतात. त्यांना नेहमी चांगले आयुष्य जगायला आवडतो. तडजोड करणे त्यांना आवडत नाही.
कठीण परिस्थिती खूप चांगल्याने हाताळतात
मूलांक १ असलेले लोक कोणतीही कठीण परिस्थिती खूप चांगल्याने हाताळतात आणि त्याचा हसतमुखाने सामना करतात पण चारही बाजूने संकट आले तर अडचणीत येतात पण हार मानत नाही आणि मोठ्या हिंमतीने ते त्या परिस्थितीतून बाहेर पडतात.
मूलांक १ असलेल्या लोकांना मिळते यश
आयुष्यात भरघोस यश मिळवण्यासाठी नियमित सुर्योदयाच्या वेळी सूर्याचे दर्शन घ्यावे. सूर्याची पूजा आराधना केल्याने त्यांना फायदा होऊ शकतो.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)