scorecardresearch

पुढील २६ दिवस ‘या’ राशींना मिळणार प्रचंड पैसा? शनि- सूर्याच्या कृपेने तुम्हीही होऊ शकता श्रीमंत

Sun Transit In Capricorn: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य देवाने मकर राशीत प्रवेश केला आहे आणि ते तिथे १३ फेब्रुवारीपर्यंत विराजमान राहतील. ज्यामुळे तीन राशीच्या लोकांना फायदा होऊ शकतो.

पुढील २६ दिवस ‘या’ राशींना मिळणार प्रचंड पैसा? शनि- सूर्याच्या कृपेने तुम्हीही होऊ शकता श्रीमंत
फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम

Sun Planet Transit: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी राशी बदलतात. तसेच, ते एका विशिष्ट कालावधीने त्या राशीमध्ये विराजमान होतात. १४ जानेवारी रोजी सूर्य देवाने मकर राशीत प्रवेश केला आहे. मकर रास ही शनिदेवाची रास असून त्यावर शनिदेवाचे राज्य आहे. सूर्यदेव १३ जानेवारीपर्यंत येथे विराजमान राहतील. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल. पण अशा ३ राशी आहेत ज्यांचे नशीब यावेळी चमकू शकते. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या राशी..

सिंह राशी

सूर्यदेवाचे संक्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण सूर्य देव तुमच्या राशीतून पाचव्या भावात प्रवेश करत आहेत. त्यामुळे याकाळात नोकरदारांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल आणि कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल. यासोबतच याकाळात तुमच्या कुटुंबाशी तुमचे संबंध चांगले राहतील. त्याचबरोबर कौटुंबिक जीवनही अनुकूल असणार आहे. तसेच, सूर्य देव तुमच्या राशीचा स्वामी आहे, त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी शुभ आणि फायदेशीर ठरू शकतो.

मीन राशी

सूर्य देवाचे राशी परिवर्तन मीन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. कारण सूर्य हे ग्रह तुमच्या राशीतून अकराव्या भावात प्रवेश करतील. जे उत्पन्न आणि लाभाचे स्थान मानले जाते. त्यामुळे याकाळात शेअर बाजाराशी संबंधित लोकांना चांगला फायदा मिळू शकतो आणि यामुळे आर्थिक परिस्थितीही सुधारू शकते. दुसरीकडे, व्यवसाय करणाऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. दुसरीकडे, मीन राशीवर गुरू ग्रहाचे राज्य आहे आणि ज्योतिषशास्त्रानुसार, गुरु आणि सूर्य यांच्यात मैत्रीची भावना आहे. त्यामुळे १३ फेब्रुवारीपर्यंतचा काळ मीन राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकतो.

( हे ही वाचा; ‘अखंड साम्राज्य राजयोग’ बनल्याने ‘या’ राशी होणार श्रीमंत? शनि- गुरू मिळून देणार प्रचंड धनलाभाची संधी)

मेष राशी

सूर्य ग्रहाचे संक्रमण तुमच्यासाठी शुभ ठरू शकते. या काळात तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि जर तुम्ही व्यापारी असाल तर तुम्हाला सूर्यदेवाची साथ मिळू शकते. यासोबत जे बेरोजगार आहेत त्यांना नोकरीच्या नवीन संधी मिळू शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांसाठीही हा काळ शुभ ठरणार आहे. यावेळी कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. तसच पदोन्नती आणि वेतनवाढ याचीही शक्यता दिसत आहे.

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-01-2023 at 11:35 IST

संबंधित बातम्या