scorecardresearch

Premium

पुढील ३० दिवस सिंहसह ‘या’ राशींच्या लोकांना होणार धनलाभ? सुर्यदेवाच्या गोचराने मिळू शकते सरकारी नोकरी

येत्या दिवसात काही राशींचं नशीब अगदी सूर्याप्रमाणे चमकू शकते, पाहा तुमची रास आहे का यात…

Surya Gochar 2023
सुर्य गोचर (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

ग्रह एका विशिष्ट वेळी एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. वैदिक ज्योतिषशास्त्रात या बदलांचा परिणाम प्रत्येक राशीवर कमी-अधिक प्रमाणात होत असतो. सूर्याला शक्तीचा कारक म्हणतात. आता ग्रहांचा राजा मानल्या जाणाऱ्या सूर्याने कन्या राशीत प्रवेश केला असून ते १८ ऑक्टोबरपर्यंत कन्या राशीत राहतील. यामुळे या काळात काही राशींचं नशीब अगदी सूर्याप्रमाणे चमकण्याची शक्यता आहे, चला तर पाहूया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

कोणत्या राशींना मिळणार लाभ?

सिंह राशी

सिंह राशीच्या मंडळीसाठी सुर्यदेवाचे गोचर फलदायी ठरु शकते. या राशीच्या लोकांना ठरलेल्या योजनांमध्ये अपेक्षित यश मिळू शकते. सरकारी नोकरीसाठी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश या काळात मिळू शकते. प्रेमाची साथ लाभल्याने मानसिक ताण दूर होऊ शकतात. या राशीतील लोकांना एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. येत्या काळात पैसे कमवण्याची संधी मिळू शकते.

Daily Horoscope 5 october 2023
Daily Horoscope: मीनला अचानक धनलाभाची शक्यता तर ‘या’ राशीच्या व्यक्तींना नोकरीत मनासारखे काम मिळणार, पाहा भविष्य
Surya Budh Yuti 2023
१७ ऑक्टोबरपर्यंत ‘या’ चार राशींना होणार अपार धनलाभ? सूर्य-बुधदेवाच्या युतीने होऊ शकते उत्पन्नात प्रचंड वाढ
Surya Grahan 2023
सर्वपित्री अमावस्येला दूसरे सूर्यग्रहण ‘या’ राशींचे नशीब सोन्याहून चमकवणार? पितरांच्या कृपेने येऊ शकतात सुखाचे दिवस
16 Days Later Budh Gochar Vaibhav Lakshmi Making Bhadra Rajyog Till Dussehra These Three Rashi Can Get Gold Money Astrology
१६ दिवसांनी बुधदेव व वैभवलक्ष्मी ‘या’ ३ राशींमध्ये भद्र राजयोग बनवणार! दसऱ्यापर्यंत सोन्यासारखे दिवस जगता येतील

(हे ही वाचा : बारा वर्षांनी देवगुरु वक्री झाल्याने चार महिने ‘या’ राशींना देणार अपार पैसा? माता लक्ष्मीच्या कृपेने होऊ शकता कोट्याधीश )

धनु राशी

सुर्यदेवाचे गोचर झाल्याने हा काळ धनु राशींच्या लोकांसाठी आनंदाचा व अनुकूल ठरु शकतो. या राशीच्या लोकांच्या जीवनात सुख, संपत्ती आणि समृद्धीची शक्यता निर्माण होत आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा फायदा तुम्हाला मिळू शकतो. आर्थिक लाभाच्या दृष्टीनेही हा काळ चांगला ठरु शकतो. या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. 

मिथुन राशी

या गोचरच्या काळात मिथुन राशीच्या लोकांना बक्कळ पैसा मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला धार्मिक कार्यातून आनंद मिळू शकतो, तुमच्या नोकरीत प्रगती होऊ शकते. व्यवसायातही अपेक्षित लाभ होऊ शकतो. आर्थिक स्थिती सुधारल्याने कौटुंबिक वातावरणही चांगलं राहू शकते. जुन्या आजारातून या काळात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sun planet transit in vigro these three zodic signs bank balance to raise money marathi astrology pdb

First published on: 20-09-2023 at 13:07 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×