scorecardresearch

नवरात्रीनंतर सूर्य देव बदलणार राशी; ‘या’ ३ राशींचे नशीब अचानक बदलणार

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार नवरात्रीनंतर सूर्य देव तूळ राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य देवाचे संक्रमण होताच ३ राशींना व्यवसाय आणि करिअरमध्ये चांगले यश मिळू शकते.

नवरात्रीनंतर सूर्य देव बदलणार राशी; ‘या’ ३ राशींचे नशीब अचानक बदलणार
फोटो(संग्रहित फोटो)

Sun Gochar In Tula: ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एखादा ग्रह राशी बदलतो तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर, देशावर आणि जगावर होतो. ग्रहांचा राजा सूर्य नवरात्रीनंतर तूळ राशीत प्रवेश करेल. या बदलाचा प्रभाव सर्व राशींवर राहील. मात्र अशा ३ राशी आहेत, ज्यांच्यासाठी हे संक्रमण फायदेशीर ठरू शकते. चला जाणून घेऊया या राशींबद्दल…

कन्या राशी

सूर्य ग्रहाचे भ्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. कारण सूर्य ग्रह तुमच्या राशीतून दुसऱ्या भावात प्रवेश करणार आहेत. जे धन आणि वाणीचे घर मानण्यात येते त्यामुळे या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे दिसत आहे. तसेच जर तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील तर ते या काळात पुन्हा मिळू शकतात. तसेच, यावेळी तुमची आर्थिक स्थिती मजबूत असण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर देखील येऊ शकते. यावेळी व्यवसायात दिलेले पैसे परत मिळू शकतात.

( हे ही वाचा: ऑक्टोबर महिन्यात बनतोय अतिशय शुभ संयोग, ७ ग्रह बदलतील त्यांची राशी; ‘या’ राशींना मिळेल अपार पैसा आणि समृद्धी)

धनु राशी

सूर्य देव तूळ राशीत प्रवेश केल्याने करिअर आणि व्यवसायात चांगले यश मिळू शकते. कारण तुमच्या संक्रमण कुंडलीवरून सूर्य देवाचे संक्रमण अकराव्या भावात होणार आहे, जे उत्पन्न आणि लाभाचे स्थान मानण्यात येते. त्यामुळे यावेळी तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ देखील होण्याची शक्यता आहे. तसेच या काळात उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तसंच व्यवसायात नवीन ऑर्डर मिळाल्याने चांगला नफा देखील होऊ शकतो. या काळात तुम्ही मालमत्ता आणि वाहन खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता. तसेच, मालमत्तेत गुंतवणूक करण्यासाठी वेळ अनुकूल आहे.

मकर राशी

सूर्य ग्रहाचा राशी बदल तुमच्यासाठी शुभ सिद्ध होण्याची शक्यता आहे. कारण सूर्य ग्रह तुमच्या राशीतून दहाव्या भावात भ्रमण करणार आहेत. जे काम, व्यवसाय आणि नोकरीचे ठिकाण मानले जाते. त्यामुळे यावेळी तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळण्याची शक्यता आहे. तसेच तुम्ही नोकरीत असाल तर तुम्हाला बढती मिळू शकते. त्याच वेळी, आपण कोणत्याही जुन्या आजारापासून मुक्त होऊ शकता. न त्याचबरोबर तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते. दुसरीकडे, तुम्ही व्यवसायात नवीन ऑर्डर मिळवून चांगले पैसे कमवू शकता.

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या