Sun Rashi Transit 2026: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे काही निश्चित कालावधीनंतर राशी परिवर्तन होते; ज्याचा प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मा आणि पित्याचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य मजबूत असतो, त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर यश, सुख, पद-प्रतिष्ठा, मान-सन्मान प्राप्त होतो. इतर ग्रहांप्रमाणेच सूर्यदेखील ठराविक काळानंतर राशी परिवर्तन करतो. सूर्याच्या परिवर्तनामुळे १२ राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात विविध बदल आपल्याला पाहायला मिळतात.
पंचांगानुसार, सूर्यदेव १७ ऑगस्ट २०२६ रोजी आपली स्वराशी असलेल्या सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याचे हे गोचर नक्कीच काही राशींच्या लोकांचे भाग्य चमकेल.
सूर्याचे गोचर मालामाल करणार
सिंह (Singh Rashi)
सिंह राशीच्या व्यक्तींना सूर्याचे राशी परिवर्तन खूप लाभदायी असेल. हे राशी परिवर्तन तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. निर्यात आणि आयात व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. या काळात मुलांकडून आनंदी वार्ता येतील. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल आणि तुम्ही जमीन आणि वाहन खरेदीच्या दिशेने वाटचाल कराल. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळेल.
कर्क (Kark Rashi)
कर्क राशीच्या व्यक्तींना सूर्याचे राशी गोचर अत्यंत शुभ सिद्ध होईल. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात प्रचंड यश मिळेल आणि उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. तसेच, बेरोजगार लोकांना यावेळी नवीन नोकरी मिळू शकते. त्याचबरोबर नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकते. तसेच, यावेळी, तुमच्या वडिलांबरोबरच्या नातेसंबंधात सुधारणा होईल. तुमचा मान-सन्मान वाढेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. संयम आणि शिस्त ही तुमची सर्वात मोठी ताकद बनेल.
धनु (Dhanu Rashi)
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याचे राशी परिवर्तन धनु राशीच्या व्यक्तींना विशेष लाभदायी असेल. या राशी परिवर्तनामुळे आकस्मिक धनलाभ होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. या काळात अनेक भौतिक सुखे प्राप्त होतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. एका अनुभवी व्यक्तीचा सल्ला भविष्यात फायदेशीर ठरू शकतो. भविष्याचे नियोजन यशस्वी होऊ शकते.
मीन (Meen Rashi)
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याचे राशी परिवर्तन मीन राशीसाठी करिअरला चालना देणारे आणि सन्मान वाढवणारे ठरू शकते. सूर्याचा शुभ प्रभाव तुमच्या प्रयत्नांना नवी दिशा देईल. जुन्या समस्या कमी होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाची उघडपणे प्रशंसा केली जाईल. नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. थांबलेल्या व्यावसायिक वाटाघाटी पुन्हा पुढे सरकू शकतात. तुम्हाला एका जुन्या ग्राहकाकडून महत्त्वपूर्ण लाभ मिळू शकतो. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. घरात शांतता आणि सुव्यवस्था नांदेल. प्रेमसंबंधांमधील भावनिक बंध अधिक घट्ट होतील. विद्यार्थी आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
