Saturn and Sun shadashtak yog 2026: ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याला ग्रहांचा राजा मानले जाते. सूर्याचे प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन होते. कुंडलीत सूर्य शुभ असेल, तर व्यक्तीला आयुष्यात आत्मविश्वास, यश, मान-सन्मान, पैसा, पद यांसारख्या बऱ्याच गोष्टी प्राप्त होतात. तसेच शनी ग्रहाला कर्मफळ दाता म्हटले जाते. सध्या सूर्य मिथुन राशीत असून शनीदेव मीन राशीत विराजमान आहे. पंचांगानुसार, १७ ऑक्टोबर रोजी सूर्य कन्या राशी सोडून सर्वात खालच्या राशीत, म्हणजेच तूळ राशीत प्रवेश करेल. हे संक्रमण सायंकाळी ७ वाजून ५७ वाजता होईल. तूळ राशीत प्रवेश केल्यावर, सूर्य कुंभ राशीत असलेल्या शनीसोबत षडाष्टक योग तयार करेल.
ज्योतिषशास्त्रानुसार हा योग शुभ मानला जात नाही. या योगामुळे काही राशींना त्यांच्या जीवनात चढ-उतारांचा सामना करावा लागू शकतो. या राशींना त्यांच्या करिअर आणि आर्थिक बाबींबाबतही सावधगिरी बाळगावी लागेल. चला तर मग जाणून घेऊया की या कोणत्या राशी आहेत आणि षडाष्टक योगाच्या नकारात्मक प्रभावांपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी कोणते उपाय योजले जाऊ शकतात.
‘षडाष्टक योग’ नशीब चमकवणार
वृषभ (Vrushabh Rashi)
वृषभ राशीसाठी, षडाष्टक योगादरम्यान सूर्य तुमच्या सहाव्या घरात असेल, तर शनी तुमच्या अकराव्या घरात असेल. सूर्य आणि शनी यांच्यात तयार झालेल्या षडाष्टक योगामुळे कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगा आणि गुंतवणूक करण्यापूर्वी सल्ला घ्या. तुम्हाला पोटदुखी आणि डोकेदुखीचा त्रास देखील होऊ शकतो, त्यामुळे तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या. यावर उपाय म्हणून, तुम्ही शिव चालिसाचे पठण करावे.
तूळ (Tula Rashi)
तूळ राशीसाठी, सूर्य तुमच्या राशीत गोचर करेल आणि शनीसोबत षडाष्टक योग तयार करेल. हा योग तुमच्या करिअरमध्ये आव्हाने निर्माण करू शकतो. काहींसाठी कामाचा ताण वाढू शकतो, ज्यामुळे मानसिक ताण येऊ शकतो. भागीदारीत असलेल्यांना त्यांच्या जोडीदाराच्या हालचालींकडे लक्ष देण्याची गरज आहे. चुकूनही जुगार खेळणे टाळा, कारण यामुळे मोठे नुकसान होऊ शकते. कुटुंबातील सदस्यांशी एखाद्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात. संभाषणादरम्यान शब्दांचा काळजीपूर्वक वापर करा. यावर उपाय म्हणून, तूळ राशीच्या व्यक्तींनी हनुमान चालिसाचे पठण करावे.
मीन (Meen Rashi)
षडाष्टक योगादरम्यान, शनी तुमच्या राशीत असेल, तर सूर्य तुमच्या आठव्या घरात असेल. त्यामुळे, षडाष्टक योग तुमच्या जीवनात अडथळे निर्माण करू शकतो. काही लोकांच्या पदोन्नतीला विलंब होऊ शकतो, ज्यामुळे निराशा येऊ शकते. खर्चात अचानक वाढ झाल्याने तुमची आर्थिक परिस्थिती धोक्यात येऊ शकते. कर्ज घेणे टाळणे फायदेशीर ठरेल. तुम्हाला कोर्ट केससाठी धावपळ करावी लागू शकते. यावर उपाय म्हणून, मीन राशीच्या लोकांनी सूर्याला समर्पित मंत्रांचा जप करावा.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
