Sun Transit in Libra 2026: ऑक्टोबर महिना ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. या काळात अनेक ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीत बदल होणार असून त्यातील महत्त्वाचा बदल म्हणजे सूर्याचे राशी परिवर्तन. सध्या सूर्य कन्या राशीत असून १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सूर्य तूळ राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर सुमारे एक महिना म्हणजे १६ नोव्हेंबरपर्यंत सूर्य तूळ राशीतच राहील. ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्याला आत्मविश्वास, मान-सन्मान, अधिकार, करिअर आणि व्यक्तिमत्त्वाचा कारक मानले जाते. त्यामुळे सूर्याच्या राशी परिवर्तनाचा परिणाम वेगवेगळ्या राशींवर वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकतो. काही राशींना या काळात सावध राहण्याचा सल्ला दिला जातो. तर जाणून घेऊया कोणत्या राशींनी खबरदारी बाळगण्याची आवश्यकता आहे…

मेष राशी

ऑक्टोबरमध्ये सूर्य गोचरामुळे मेष राशीच्या व्यक्तींनी व्यावसायिक व्यवहारांमध्ये विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवून आर्थिक व्यवहार करणे टाळावे. या काळात लांबच्या प्रवासाचे नियोजन करताना काळजी घ्यावी. कुटुंबातील व्यक्तींशी काही मतभेद निर्माण होऊ शकतात. आत्मविश्वासात चढ-उतार जाणवू शकतात. त्यामुळे कोणतेही नवीन काम सुरू करण्यापूर्वी विचारपूर्वक निर्णय घेणे फायदेशीर ठरेल.

मिथुन राशी

मिथुन राशीसाठी ऑक्टोबर महिना काहीसा आव्हानात्मक ठरू शकतो. सूर्य तूळ राशीत प्रवेश केल्यानंतर काही कामांमध्ये अपेक्षित परिणाम मिळण्यास विलंब होऊ शकतो. मानसिक ताण आणि आर्थिक बाबतीत चिंता जाणवू शकते. अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता असल्याने खर्चाचे योग्य नियोजन करणे महत्त्वाचे ठरेल. कामाच्या ठिकाणी गैरसमज होऊ नयेत यासाठी बोलताना संयम ठेवणे आवश्यक आहे.

कन्या राशी

कन्या राशीच्या व्यक्तींना सूर्य गोचरामुळे काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक स्थितीवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
चुकीची किंवा अपुरी माहिती मिळाल्यामुळे मन अस्वस्थ होऊ शकते. विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक मेहनत घ्यावी लागू शकते. कुटुंबातील काही समस्या चिंता वाढवू शकतात. सरकारी कामांमध्येही विलंब किंवा अडथळे येण्याची शक्यता व्यक्त केली जाते.

तूळ राशी

सूर्याचा प्रवेश थेट तूळ राशीत होणार असल्याने या राशीसाठी हा गोचर विशेष महत्त्वाचा आहे. नोकरी किंवा व्यवसायात काही अडथळे निर्माण होऊ शकतात. कामाचा ताण वाढू शकतो आणि आत्मविश्वासात काही प्रमाणात कमतरता जाणवू शकते. विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासातून विचलित होण्याची शक्यता आहे. खर्च वाढल्याने कर्जाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे मोठे आर्थिक निर्णय घेताना घाई न करणे योग्य ठरेल.

धनु राशी

धनु राशीच्या व्यक्तींना सूर्य गोचराच्या काळात काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. आरोग्याशी संबंधित त्रासांकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला दिला जातो. कामांमध्ये अडथळे किंवा विलंब निर्माण झाल्यास त्याचा मानसिक तणाव जाणवू शकतो. कार्यक्षेत्रातही अडचणी येण्याची शक्यता आहे. गुंतवणूक किंवा आर्थिक व्यवहार करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे अधिक सुरक्षित ठरू शकते.

कुंभ राशी

कुंभ राशीसाठी सूर्याचा तूळ राशीतील प्रवेश काही बाबतीत प्रतिकूल परिणाम देऊ शकतो. या काळात सुख-सुविधांवर अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता असल्याने आर्थिक नियोजन महत्त्वाचे ठरेल. कोर्ट-कचेरी किंवा जमीन-जुमल्याशी संबंधित प्रकरणांमध्ये धावपळ वाढू शकते. विरोधकांकडून अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील समस्यांमध्ये संयमाने परिस्थिती हाताळणे आवश्यक राहील.