Sun Effect 2026 : लवकरच नवीन वर्ष सुरु होणार असून येणारे नवीन वर्ष ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोणातून खूप खास मानले जाणार आहे. या वर्षात ग्रहांचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तनही होईल. जे काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. तसेच अंकशास्त्रानुसार, २०२६ या वर्षाचा मूलांक १ असल्याने हे वर्ष ग्रहांचा राजा सूर्यदेवाचे असेल. या वर्षावर सूर्याचे अधिक वर्चस्व असेल. सूर्य आत्मा, ऊर्जा, आत्मविश्वास, नेतृत्व आणि सफलतेचा कारक ग्रह मानला जातो. त्यामुळे या वर्षात काही राशींच्या व्यक्तींवर सूर्याचा अतिशय शुभ प्रभाव पाहायला मिळेल.

‘या’ राशींवर होणार सूर्याची कृपा

सिंह (Singh Rashi)

सिंह राशीच्या व्यक्तींसाठी २०२६ हे वर्ष खूप उत्तम फळ देणारे ठरेल. कारण सिंह राशीचा राशी स्वामी सूर्य आहे जो या व्यक्तींमध्ये अधिक आत्मविश्वास आणि नेतृत्व अधिक निर्माण करेल. या वर्षात तुमचे प्रमोशनही होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबीयांची साथ मिळेल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल.

मिथुन (Mithun Rashi)

मिथुन राशीच्या व्यक्तींना देखील २०२६ हे वर्ष खूप सकारात्मक सिद्ध होईल. या राशीच्या व्यक्तींना नव्या वर्षात अनेक गोष्टी साध्य करता येतील. करिअरमध्ये चांगले बदल पाहायला मिळतील. अडकलेले पैसे परत मिळतील. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. केवळ आपल्या आईच्या आरोग्याची काळजी घ्या. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. धार्मिक यात्रा घडतील.

धनु (Dhanu Rashi)

धनु राशीच्या व्यक्तींना देखील २०२६ हे वर्ष फायदेशीर ठरेल. या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात हव्या गोष्टी मिळवता येतील. या काळात प्रमोशन होईल. आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होईल. गुंतवणूकीतून चांगला फायदा होईल. व्यवसायात चांगला परिणाम पाहायला मिळेल. आरोग्य चांगले राहील.

कर्क (Kark Rashi)

कर्क राशीच्या व्यक्तींना नवीन वर्ष खूप अनुकूल सिद्ध होईल. कुटुंबातील वाद मिटतील. कुटुंबात शांततेचे वातावरण राहील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. व्यवसाय करणाऱ्यांना धनलाभ होईल. आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक जीवन सुखाचे क्षण येतील.

तूळ (Tula Rashi)

तूळ राशीच्या व्यक्तींनाही २०२६ खूप लकी सिद्ध होईल. आर्थिक स्थिती स्थिर राहील. मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. प्रत्येक क्षेत्रात सुख, समाधान प्राप्त होईल. नवे लोक, नवे छंद यांच्याशी जोडले जाल. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. मुलांकडून आनंदी वार्ता मिळतील.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)