Surya Gochar 2026 : ज्योतिषशास्त्रानुसार, एप्रिल २०२६ मध्ये अनेक चढ-उतार आणि बदलांची शक्यता आहे. ग्रहांचा राजा, सूर्य, १४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८:३८ वाजता मेष राशीत प्रवेश करेल. हा गोचर १५ मे २०२६ पर्यंत राहणार असून, काही राशींना शुभ परिणाम देतील, तर काहींना आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो.
सूर्याचा मेष राशीत प्रवेश हा ऊर्जा, आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि धैर्य वाढवणारा मानला जातो. मात्र, काही राशींसाठी हे गोचर मानसिक ताण, आर्थिक अडचणी आणि नातेसंबंधांमध्ये समस्या निर्माण करू शकते. विशेषतः वृषभ, धनु, मकर आणि मीन राशीच्या लोकांनी काळजी घ्यावी.
वृषभ राशी (Turus)
वृषभ राशीच्या लोकांना या काळात नातेसंबंध आणि भागीदारीसंबंधी अडचणी येऊ शकतात. छोटी गोष्ट मोठी वादविवादास कारणीभूत ठरू शकते. अशा परिस्थितीत संयम राखणे, भावनिक संतुलन ठेवणे आणि नकारात्मक परिस्थितीवर त्वरित प्रतिक्रिया न देणे महत्त्वाचे आहे. भागीदारीच्या निर्णयांमध्ये योग्य विचार आणि संवाद आवश्यक आहे.
धनु राशी (Sagittarius)
धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ परीक्षेत किंवा करिअरमध्ये काही आव्हानात्मक परिस्थिती घेऊन येऊ शकतो. मुलांच्या शिक्षण किंवा कुटुंबातील प्रश्न तुमचे लक्ष विचलित करू शकतात. त्यामुळे महत्वाच्या निर्णयांमध्ये धैर्य आणि शिस्त पाळणे गरजेचे आहे. यशासाठी योग आणि मेहनत वाढवणे महत्त्वाचे ठरेल.
मकर राशी (Capricorn)
मकर राशीच्या लोकांना गोचरामुळे मानसिक ताण, संवाद साधताना गैरसमज होऊ शकतात आणि कामाच्या ठिकाणी ताण-तणावाचा सामना करावा लागू शकतो. बोलताना आणि लेखी व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. घाईत निर्णय टाळा आणि प्रत्येक गोष्टीचे बारकाईने मूल्यांकन करा.
मीन राशी (Pisces)
मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ आरोग्य आणि भावनिक स्थिरतेच्या बाबतीत विशेष काळजीची गरज दाखवतो. मोठे निर्णय घेण्यापूर्वी विचार करणे आवश्यक आहे. व्यायाम, ध्यान, संतुलित आहार आणि नीट झोप यावर भर द्या. भावना नियंत्रणात ठेवून वर्तन करणे फायदेशीर ठरेल.
१४ एप्रिल २०२६ पासून सुरू होणारा सूर्याचा मेष राशीतील गोचर काहींसाठी उत्साह आणि यशाचे संकेत देतो, तर काहींसाठी मानसिक, आर्थिक आणि नातेसंबंधातील आव्हाने घेऊन येतो. योग्य संयम, शिस्त, संवाद आणि आरोग्याची काळजी घेणे या काळात सर्व राशींसाठी आवश्यक आहे.
