5th February Horoscope Marathi: ५ फेब्रुवारी, सोमवार, या आठवड्याच्या पहिल्या दिवशी काही राशींना कामामध्ये अधिक लक्ष द्यावे लागणार आहे. काहींना प्रवासादरम्यान विशेष काळजी घ्यावी लागेल. आज प्रत्येक राशीच्या कुंडिलीचे ग्रहमान कसे असेल पाहा.

मेष:-शक्यतो कोणत्याही दडपणात राहू नका. शेजारी, भावंडे यांच्याशी सबुरीने वागावे. तुमच्या मित्रपरिवारात वाढ होईल. बेसावधपणे कोणतेही काम करू नका. महिलांच्या शब्दाला मान मिळेल.

India abortion law
गर्भधारणेनंतर ३० आठवड्यांपर्यंत गर्भपातास परवानगी, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; भारतीय गर्भपात कायदा काय आहे?
The price of gold reached the highest level
विश्लेषण: सोन्याला तेजीची झळाळी का?
17 Days Later Surya Nakshatra Gochar In Revati These Three Rashi To Earn Money
येत्या १७ दिवसात ‘या’ ३ राशींच्या कुंडलीत सूर्याची किरणं दाखवतील श्रीमंतीचा मार्ग; गुढीपाडव्यानंतर बदलणार नशीब
Sagittarius April Horoscope
Sagittarius : धनु राशीच्या लोकांनी एप्रिल महिन्यात घ्यावी विशेष काळजी; कशी असेल त्यांची आर्थिक स्थिती अन् लव्ह रिलेशन? जाणून घ्या

वृषभ:-जुन्या दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका. शक्यतो कामातील चुका टाळाव्यात. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. क्षुल्लक कारणांवरून होणारे मतभेद टाळा. अनुभवाची शिदोरी गोळा करता येईल.

मिथुन:-वैवाहिक जीवनातील कुरबुरी टाळाव्यात. अल्लडपणा करून चालणार नाही. एकाचवेळी अनेक कामात लक्ष घालू नका. वडीलधार्‍यांचा शब्द प्रमाण मानवा लागेल. आशावादी दृष्टिकोन ठेवावा.

हेही वाचा : लक्ष्मी नारायण योगाने फेब्रुवारीचे ‘हे’ ८ दिवस होतील सोन्याचे; ‘या’ राशी गडगंज श्रीमंतीसह अनुभवतील आयुष्य बदलणारी घटना

कर्क:-प्रवासादरम्यान सावधानता बाळगावी. मुलांविषयी चिंता लागून राहील. परिस्थिती धोरणीपणाने हाताळाल. उगाचच कोणत्याही गोष्टीचा बाऊ करू नका. ज्येष्ठांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.

सिंह:-वरिष्ठ आपल्या कामावर खुष असतील. स्थावर संबंधीच्या कामात यश येईल. वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. काही गोष्टी मनाविरूद्ध घडू शकतात. आशावादी दृष्टिकोन ठेवावा.

कन्या:-नियमांचे काटेकोर पालन करावे. वडीलधार्‍यांचे मत विचारात घ्यावे. कामगारांविषयीचे प्रश्न सामोपचाराने हाताळावेत. वाहनांवरील वेग नियंत्रित ठेवावा. दिवस मनाप्रमाणे व्यतीत कराल.

तूळ:-कामाचे योग्य व्यवस्थापन करावे. पत्रव्यवहारात अडचणी येवू शकतात. तुमच्यातील बिनधास्तपणा सकारात्मकतेने वापरावा. मित्रमंडळींचे सहाय्य लाभेल. घरातील कुरबुरी दूर कराव्यात.

वृश्चिक:-कोणत्याही चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नका. इस्टेटीसंबंधीचे वाद वाढू शकतात. विद्यार्थ्यानी चिकाटी सोडू नये. ध्यानधारणा, ओंकार यांची मदत घ्यावी. आर्थिक परिस्थितीवर मात करता येईल.

धनू:-भागीदारीतील ताणतणाव दूर करावेत. वडीलधार्‍यांचे आशीर्वाद मिळतील. उधारीची कामे सावधगिरीने करावीत. तीर्थाटनाचा योग येईल. कामानिमित्त प्रवास कराल.

हेही वाचा : Pisces Yearly Horoscope 2024 : मीन राशीसाठी कोणता महिना आर्थिकदृष्ट्या ठरेल फायदेशीर? विवाहोत्सुक मंडळींना मिळेल मनाजोगता जीवनसाथी

मकर:-घेतलेल्या कष्टाचे चीज होईल. काही कामात दिरंगाई होण्याची शक्यता आहे. अति श्रमामुळे थकवा जाणवेल. वरिष्ठांची मर्जी राहील. प्रवासात समानाची काळजी घ्यावी.

कुंभ:-मुलांच्या तब्बेतीची कुरबुर राहील. या ना त्या कारणाने खर्च होईल. बदलीची चिन्हे दिसतील. स्थावर दृष्टीने अनुकूल फळे मिळतील. प्राणायाम, ध्यानधारणेने मनाला काबूत ठेवा.

मीन:-प्रलोभनापासून दूर राहावे. अध्यापन क्षेत्रात प्रगती साधता येईल. चोरांपासून सावध राहावे. प्रवासात वाहनांवरील वेग मर्यादित ठेवावा. अति धाडस करू नका.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर