Surya Nakshatra gochar 2024: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे काही निश्चित कालावधीनंतर राशी परिवर्तन होते; सूर्य प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तनही करतो. ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मा आणि पित्याचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य मजबूत असतो, त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर यश, सुख, पद-प्रतिष्ठा, मान-सन्मान प्राप्त होतो. सूर्याच्या परिवर्तनामुळे १२ राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात विविध बदल आपल्याला पाहायला मिळतात. सध्या सूर्य कन्या राशीत असून या महिन्याच्या शेवटी सूर्य हस्त नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे. जिथे आधीपासूनच केतूदेखील विराजमान आहे. त्यामुळे या नक्षत्रामध्ये या दोन्ही ग्रहांचा दुर्लभ संयोग निर्माण झाला आहे. हा संयोग काही राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभकारी सिद्ध होणार आहे.
पंचांगानुसार, सूर्य २७ सप्टेंबर रोजी सकाळी १ वाजून ३० मिनिटांनी हस्त क्षत्रामध्ये प्रवेश करणार असून तो १० ऑक्टोबरपर्यंत याच नक्षत्रामध्ये राहील. केतू आणि सूर्याची युती १० ऑक्टोबरपर्यंत राहील. त्यामुळे या काळात अनेकांवर देवी लक्ष्मीचीही अपार कृपा होईल.
या तीन राशीचे लोक होणार मालामाल
मेष
सूर्य-केतूची युतीमुळे मेष राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात खूप सकारात्मक परिणाम झाल्याचे पाहायला मिळेल. या काळात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. या काळात तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळण्याची दाट शक्यता आहे. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात तणाव मुक्त राहाल. आर्थिक परिस्थितीही उत्तम राहील.
कन्या
सूर्य आणि केतूचा चांगला प्रभाव कन्या राशीच्या व्यक्तींवरही पाहायला मिळेल. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. या काळात तुमच्यात साहस निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. या काळात अनेक भौतिक सुखे प्राप्त होतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.
हेही वाचा: पुढचे १९० दिवस शनी देणार पैसाच पैसा; ‘या’ चार राशीच्या व्यक्तींना मिळणार पैसा, पद आणि प्रतिष्ठा
धनु
सूर्य-केतूच्या युतीचा प्रभाव धनु राशीच्या व्यक्तींवरदेखील पाहायला मिळेल. या काळात तुम्हाला शैक्षणिक कार्यात यश मिळेल, परदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण होईल. अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. आयुष्यात अचानक आनंद येईल. प्रेमसंबंध सुखमय होतील. नव्या गोष्टींशी जोडले जाल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे.
(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)