Surya Ashlesha Nakshatra Gochar : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्याला ग्रहांचा राजा मानले जाते. जेव्हा जेव्हा सूर्य आपला राशी किंवा नक्षत्र बदलतो तेव्हा त्याचा परिणाम प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सर्व राशींच्या जीवनावर होत असतो. ३ ऑगस्ट रोजी सूर्य बुध ग्रहाच्या आश्लेषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे, ज्यामुळे काही राशींसाठी अत्यंत शुभ परिणाम मिळू शकतात. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.
वृषभ
सूर्याचा अश्लेषा नक्षत्रातील प्रवेश वृषभ राशीच्या लोकांच्या .जीवनात आनंदाचे क्षण घेऊन येईल. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. व्यावसायिकांना चांगली डील मिळू शकते आणि उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनही चांगले असू शकते. नवविवाहित जोडप्यांच्या घरी नवीन पाहुणा येऊ शकतो. या काळात सामाजिक दर्जा वाढू शकतो. जर तुम्ही राजकारणात असाल, तर तुमचा चाहता वर्ग वाढू शकतो. चांगल्या लोकांच्या संगतीतून तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळू शकते.
कन्या
सूर्याचा नक्षत्र बदल कन्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात करिअरमध्ये प्रगतीचा मार्ग मोकळा करू शकतो. तुमचे गमावलेले पैसे परत मिळण्याचीही शक्यता आहे. कुटुंबातील एखादी व्यक्ती तुम्हाला चांगली बातमी देऊ शकते. जे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहेत, त्यांना योग्य दिशा मिळू शकते. जर तुम्ही परदेशात काम करण्याचे स्वप्न पाहत असाल, तर ते साकार होऊ शकते. वाहन खरेदीचा उत्तम योग आहे.
वृश्चिक
सूर्याचा नक्षत्र बदल वृश्चिक राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. तुम्हाला नशिबाची भरभरून साथ मिळेल, ज्यामुळे परिस्थिती पूर्णपणे बदलू शकते. ज्यांनी स्पर्धा परीक्षा दिली आहे, त्यांना अपेक्षित यश मिळू शकते. या महिन्यात तुम्ही तुमच्या ऊर्जेला योग्य दिशा देऊ शकता. वडिलोपार्जित व्यवसायात मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे आणि त्यांच्या जमा झालेल्या संपत्तीतही वाढ होईल. तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक बाबतीत तुमच्या वडिलांचे सहकार्यही मिळू शकते. तुमच्या आरोग्यातही सकारात्मक बदल घडू शकतात.
(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)
