Surya Budh Shani Yuti : यावर्षी ८ नोव्हेंबर रोजी दिवाळी साजरी केली जाईल. दिवाळीच्या एक दिवस आधी, म्हणजेच ७ नोव्हेंबर रोजी, तूळ राशीत त्रिग्रही योग तयार होईल. हा योग सूर्य, बुध आणि चंद्र यांच्या युतीने तयार होतो. सूर्य आणि बुध आधीच तूळ राशीत आहेत आणि ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजून १५ मिनिटांनी चंद्र कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करणार आहे, ज्यामुळे त्रिग्रही योग तयार होईल. चला जाणून घेऊया की, कोणत्या राशींना या योगाचा फायदा होऊ शकतो.

मिथुन

दिवाळीच्या एक दिवस आधी तयार होणारा त्रिग्रही योग अत्यंत शुभ ठरू शकतो. हा योग तुमच्या राशीपासून पाचव्या घरात तयार होईल. हा योग तुमची विचारशक्ती वाढवेल. योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास तुम्हाला भविष्यात फायदा होईल. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांना दिवाळीच्या दिवशी काही चांगली बातमी मिळू शकते आणि भरीव आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. तुमची एखादी गोष्ट सोशल मीडियावर खळबळ माजवू शकते. विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढेल, ज्यामुळे शिक्षण क्षेत्रात तुम्हाला यश मिळू शकते.

तूळ

तुमच्या राशीत त्रिग्रही योग तयार होईल, ज्यामुळे तुमचे व्यक्तिमत्व अधिक प्रभावी होऊ शकते. तुमचा आत्मविश्वासही वाढू शकतो. त्रिग्रही योगाच्या प्रभावामुळे तुमच्या खालावत चाललेल्या कामातही सुधारणा होऊ शकते. दिवाळीनंतर काही लोकांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाल. जे लोक व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत होते, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळू शकते. कौटुंबिक जीवनात आनंद नांदेल. तुम्ही जोडीदाराबरोबर व्यवसाय सुरू करू शकता.

धनु

तुमच्या राशीच्या कुंडलीच्या अकराव्या घरात त्रिग्रही योग तयार होईल, जे लाभाचे घर मानले जाते. या योगामुळे उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत मिळू शकतात आणि तुमच्या बँक बॅलन्समध्ये वाढ होऊ शकते. ज्या व्यावसायिकांच्या योजना भूतकाळात आखल्या गेल्या होत्या, त्याही दिवाळीनंतर पूर्णत्वास येऊ शकतात. जे लोक शिक्षण किंवा कामासाठी परदेशात जाण्याची योजना आखत होते, त्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. यामुळे तुमची ऊर्जा वाढू शकते.

कुंभ

तुमच्या नवव्या घरात त्रिग्रही योग तयार होईल, जे घर भाग्य आणि उच्च शिक्षणाचे घर मानले जाते. त्रिग्रही योगामुळे भाग्य तुम्हाला साथ देऊ शकते. तुम्हाला अनपेक्षित लोकांकडून लाभ मिळू शकतो. व्यावसायिक दौरे यशस्वी ठरू शकतात. तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीतून मोठा नफा मिळू शकतो. कौटुंबिक वातावरण चांगले राहील आणि तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकाल.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)