Budhaditya Rajyog 2026 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य-बुध युतीचा मानवी जीवनावर खोल प्रभाव पडतो. ग्रहांचा राजकुमार मानला जाणारा बुध २२ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ०७:३२ वाजता कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करील. सिंह राशीत आधीपासूनच सूर्यदेव विराजमान आहेत. त्यामुळे सिंह राशीत सूर्य आणि बुध यांचा मिळून ‘बुधादित्य राजयोग’ तयार होईल. ज्योतिषशास्त्रात हा राजयोग अपार धनसंपदा, उच्च पद, प्रतिष्ठा, तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि उत्तम नेतृत्व क्षमतेचा कारक मानला जातो. या युतीचा प्रभाव सर्व १२ राशींच्या लोकांवर पडेल; परंतु ४ राशींच्या लोकासाठी हा काळ सुवर्णकाळासारखा सिद्ध होईल.
वृषभ
हा काळ वृषभ राशीच्या लोकांसाठी आर्थिक लाभाचे संकेत घेऊन येत आहे. या काळात नशिबाची पूर्ण साथ लाभेल. अचानक धनलाभ झाल्यामुळे बँक बॅलन्स वाढू शकतो. नातेवाईक आणि मित्रांचे सहकार्य लाभेल. व्यापाऱ्यांना व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. नवीन करार किंवा डील साइन करण्याची संधी मिळू शकते. समाजात मान-सन्मान वाढेल. जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवाल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. गुंतवणुकीच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील. तसेच, जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकेल. तुमच्यातील नेतृत्वगुण अधिक प्रभावी ठरतील.
मिथुन
सूर्य-बुध युती मिथुन राशीसाठी विशेष फलदायी ठरेल. या काळात तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. नोकरदारवर्गाला वेतनवाढीसह प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम राहील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना यश मिळू शकते. आत्मविश्वास वाढेल आणि तुमच्या मेहनतीला यश मिळेल. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना उत्तम संधी प्राप्त होतील. कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण राहील आणि घरात शुभ किंवा मांगलिक कार्ये पार पडू शकतात.
सिंह
ही युती सिंह राशीच्या लोकांसाठी प्रगतीचे नवे मार्ग खुले करील. नोकरीत प्रगतीचे योग आहेत. नोकरदार व्यक्तींना नवीन आणि चांगल्या संधी मिळतील. प्रेमसंबंधांमध्ये सुधारणा होईल. अचानक धनलाभाचे योग बनत आहेत. एखादी खूशखबर मिळाल्याने मन प्रसन्न राहील. व्यवसायाच्या निमित्ताने केलेले प्रवास लाभदायक ठरतील. नशिबाची पूर्ण साथ मिळाल्याने रखडलेली कामे वेगाने पूर्ण होतील.
तूळ
या काळात तूळ राशीच्या लोकांची बोलण्याची पद्धत अत्यंत प्रभावशाली राहील. तुम्ही स्वतःच्या कर्तृत्वावर कामात यश मिळवाल. नशिबाची साथ मिळाल्याने रखडलेल्या कामांना गती मिळेल. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी संपर्क येईल, ज्याचा थेट फायदा तुमच्या करिअरला होईल. उत्पन्नात वाढ होण्याचे स्पष्ट संकेत आहेत. नोकरदार वर्गाला अपेक्षित निकाल मिळतील. वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य लाभल्यामुळे तुम्ही यशाची नवी शिखरे सर कराल.
(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)
