Surya Budh Yuti Drishti Yog August 2026: वैदिक ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला बुद्धी, तर्क, वाणी, व्यापार आणि कौशल्याचा कारक मानलं जातं, तर सूर्य हा आत्मविश्वास, आरोग्य, मान-सन्मान आणि सरकारी कामांचा कारक आहे. हे दोन्ही ग्रह एकमेकांचे मित्र मानले जातात. त्यामुळे सूर्य आणि बुध विशिष्ट स्थितीत आल्यास त्याचा अनेक राशींवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.

२७ ऑगस्ट २०२६ रोजी गुरुवारी रात्री १० वाजून ३१ मिनिटांनी सूर्य आणि बुध एकाच अंशावर म्हणजेच शून्य अंशावर वर येणार आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार, या स्थितीमुळे ‘युति दृष्टि योग’ तयार होणार असल्याचं मानलं जातं. या योगाचा विशेष लाभ काही राशींना मिळू शकतो. करिअरमध्ये प्रगती, आर्थिक लाभ, सामाजिक प्रतिष्ठा आणि रखडलेल्या कामांना गती मिळण्याचे संकेत आहेत.

वृषभ राशी : नोकरीत प्रमोशन, व्यवसायात आर्थिक फायदा

वृषभ राशीच्या लोकांसाठी सूर्य-बुधाचा हा योग शुभ ठरू शकतो. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना अचानक आर्थिक फायदा होऊ शकतो. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. कुटुंब आणि वैवाहिक जीवनात जोडीदाराची साथ मिळेल. समाजातील मान-सन्मान वाढण्याची शक्यता असून तुमच्या कामाचं कौतुकही होऊ शकतं.

मिथुन राशी : रखडलेली कामं मार्गी लागणार

मिथुन राशीसाठी सूर्य-बुधाचा प्रभाव विशेष फायदेशीर ठरू शकतो. दीर्घकाळापासून रखडलेली कामं पूर्ण होण्याचे संकेत आहेत. नोकरीत पद, पगार किंवा जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आत्मविश्वास मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ चांगला ठरू शकतो. परीक्षेत किंवा शिक्षणाशी संबंधित प्रयत्नांमध्ये सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक स्तरावर तुमचा प्रभाव वाढू शकतो.

सिंह राशी : आत्मविश्वास वाढणार, अचानक धनलाभाची शक्यता

सिंह राशीच्या लोकांसाठी सूर्य-बुधाचा हा योग आत्मविश्वासात मोठी वाढ करू शकतो. नोकरीत प्रगतीच्या संधी मिळू शकतात. नवीन जबाबदाऱ्या किंवा महत्त्वाची कामं तुमच्याकडे सोपवली जाऊ शकतात. प्रवासासाठीही काळ अनुकूल राहू शकतो. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. समाजात तुमची प्रतिमा मजबूत होईल आणि तुमच्या कामाची प्रशंसा होऊ शकते. प्रेमसंबंधांमध्येही सकारात्मक बदल जाणवण्याची शक्यता आहे.

मीन राशी : व्यवसाय मजबूत होणार, संपत्तीतून लाभाचे संकेत

मीन राशीसाठी हा योग आर्थिक आणि व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकतो. व्यवसायातील परिस्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे. नवीन डील किंवा करारातून मोठा आर्थिक फायदा मिळू शकतो. पितृ संपत्तीशी संबंधित प्रकरणांमध्येही लाभाचे संकेत मिळू शकतात. सामाजिक कार्यात सक्रियता वाढेल आणि लोकांमध्ये तुमचा प्रभाव निर्माण होऊ शकतो. वैवाहिक जीवनात आनंद आणि समाधान वाढण्याची शक्यता आहे.