Surya-Chandra Yuti: ज्योतिष शास्त्रामध्ये प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते, ज्याचा शुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर विविध प्रकारे पाहायला मिळतो. मे २०२६ मध्ये सूर्याचे वृषभ राशीतील गोचर ही एक महत्त्वाची ज्योतिषीय घटना मानली जाते, शिवाय तो रोहिणी नक्षत्रात प्रवेश करेल. चंद्राच्या अधिपत्याखालील रोहिणी नक्षत्रात सूर्याच्या प्रवेशामुळे एक विशेष सूर्य-चंद्र युती निर्माण होते, जी सर्व राशींवर परिणाम करेल. २५ मे रोजी नवतपा सुरू होईल, ज्यामुळे या नऊ दिवसांसाठी तीव्र उष्णता असेल, परंतु ज्योतिषशास्त्रानुसार, हा काळ काही राशींसाठी भाग्याचे दरवाजे देखील उघडू शकतो. तापमान लोकांची परीक्षा घेईल, तर ही ग्रहस्थिती करिअर, संपत्ती आणि यशासाठी नवीन संधी देखील देऊ शकते. त्यामुळे, कोणत्या राशींना फायदा होईल.

पंचांगानुसार, २५ मे २०२६ रोजी, सूर्य रोहिणी नक्षत्रात गोचर करेल. चंद्र हा रोहिणी नक्षत्राचा स्वामी ग्रह आहे आणि जेव्हा सूर्य या नक्षत्रात प्रवेश करतो, तेव्हा एक विशेष सूर्य-चंद्र युती तयार होते. ही युती मानसिक ऊर्जा, आत्मविश्वास आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेवर प्रभाव टाकते. या काळात, व्यक्तीला नवीन ऊर्जा आणि स्पष्टता जाणवू शकते.

सूर्य-चंद्राची युती ‘या’ राशींना सुख-समाधान देणार

सिंह (Singh Rashi)

सिंह राशीच्या व्यक्तींना या काळात आनंदी आनंद होईल. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळेल. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल आणि तुम्ही जमीन आणि वाहन खरेदीच्या दिशेने वाटचाल कराल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. या काळात अनेक भौतिक सुखे प्राप्त होतील.

वृश्चिक (Vruschik Rashi)

ज्योतिषशास्त्रानुसार या काळात या राशीच्या व्यक्तींना विशेष लाभदायी परिणाम पाहायला मिळतील. आकस्मिक धनलाभ होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील.नव्या वस्तू खरेदी करू शकाल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल आणि तुम्ही जमीन आणि वाहन खरेदीच्या दिशेने वाटचाल कराल.

कुंभ (Kumbha Rashi)

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी ग्रहांची ही अवस्था खूप फायदेशीर ठरेल. आयुष्यात अनेक चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)