Surya Nakshatra Parivartan July 2026: ग्रहांचा राजा सूर्य एका निश्चित कालावधीनंतर नक्षत्र परिवर्तन करतो. जुलै महिन्यात सूर्य एका ऐवजी दोन वेळा आपल्या नक्षत्रात बदल करेल. ज्योतिषशास्त्रानुसार, ६ जुलै २०२६ रोजी सूर्याने पुनर्वसू नक्षत्रात प्रवेश केला आहे. पुनर्वसू नक्षत्राचा स्वामी ‘गुरु’ आहे. यानंतर २० जुलै २०२६ रोजी सूर्य पुष्य नक्षत्रात प्रवेश करेल आणि २ ऑगस्टपर्यंत याच नक्षत्रात राहील. पुष्य नक्षत्राचा स्वामी ‘शनी’ आहे. जुलै महिन्यातील सूर्याचे हे डबल नक्षत्र गोचर काही राशींना सकारात्मक फळं देईल. या राशींना धनलाभासह करिअरमध्ये प्रगती आणि व्यवसायात विस्तार करण्याची संधी मिळू शकते. जाणून घेऊया सूर्याच्या या नक्षत्र गोचरामुळे कोणत्या राशींचे भाग्य चमकणार आहे.
जुलैमध्ये सूर्याचे डबल नक्षत्र गोचर : ‘या’ ५ राशींसाठी ठरेल फायदेशीर
१. मेष
सूर्याचे नक्षत्र परिवर्तन मेष राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरेल. या काळात तुमच्या भौतिक सुखांमध्ये वाढ होईल. जमीन, घर आणि वाहन खरेदीचे योग आहेत. माता-पित्याचे सहकार्य लाभेल. पैतृक संपत्तीतून फायदा होऊ शकतो. अचानक धनलाभाचे योग येतील. व्यापाऱ्यांना व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी चांगल्या संधी मिळतील.
२. कर्क
कर्क राशीच्या लोकांसाठी सूर्याचे नक्षत्र गोचर फायदेशीर ठरेल. या काळात तुमची अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात. आकस्मिक धनलाभाचे प्रबळ योग आहेत. गुंतवणुकीसाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे; जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन भागीदारी किंवा मोठी डील मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबासह चांगला वेळ घालवाल.
३. वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हे गोचर भाग्याची साथ घेऊन येईल. या काळात तुम्हाला करिअरमध्ये मोठे यश मिळू शकते. धार्मिक यात्रेचे योग येत आहेत. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तर हा काळ अनुकूल राहील. रोजगाराच्या शोधात असलेल्या लोकांना यश मिळू शकते. नशिबाच्या जोरावर काही महत्त्वाची कामे पूर्ण होतील आणि एखादी चांगली बातमी कानावर पडू शकते.
४. सिंह
सिंह राशीसाठी सूर्य नक्षत्र परिवर्तन आनंदाची बातमी घेऊन येईल. या काळात एखाद्या नातेवाईकाकडून किंवा जवळच्या व्यक्तीकडून शुभ समाचार मिळू शकतो. मानसिक शांतता लाभेल. करिअरमध्ये मोठे यश मिळण्याचे संकेत आहेत. अचानक धनलाभ होऊ शकतो. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. समाजात मान-सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल.
५. मीन
मीन राशीसाठी सूर्याचे डबल नक्षत्र परिवर्तन शुभ संकेत घेऊन आले आहे. या काळात तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून येतील. आत्मविश्वासात वाढ होईल. तुमचे शौर्य आणि पराक्रम फळास येईल. जर तुम्ही कुठेतरी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर भविष्यात त्याचे उत्तम परिणाम मिळतील. नोकरीत पदोन्नती (Promotion) मिळण्यासोबतच पगारवाढीची दाट शक्यता आहे.
(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)
