scorecardresearch

Premium

पुढील वर्ष सुरु होताच ‘या’ ३ राशी होणार धनवान? लक्ष्मी-सूर्यदेव वर्षभर देऊ शकतात प्रचंड पैसा कमवण्याची संधी

Surya Gochar: येणाऱ्या नवीन वर्षांत कोणत्या राशी गडगंज श्रीमंत होऊ शकतात, पाहा जरा….

Surya Gochar 2024
२०२४ मध्ये 'या' राशींना होणार धनलाभ? (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Surya Gochar 2024: नवीन वर्ष सुरु व्हायला अवघे काही दिवस उरले आहेत. येणारे नवीन वर्ष आपल्यासाठी कसे असेल, हेच जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांना असते. यातच आता येणाऱ्या नवीन वर्षांत म्हणजे २०२४ मध्ये वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, अनेक ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. ग्रहांचा राजा सूर्यदेव नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मेष राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे काही राशींना नवीन वर्षांत भरपूर पैसा, पद-प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता आहे. चला तर पाहूया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

‘या’ राशींना मिळणार भरपूर पैसा?

मेष राशी

सूर्यदेवाचे राशी परिवर्तन मेष राशींच्या लोकांसाठी लाभकारी ठरु शकते. मोठा धनलाभ होऊन तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. प्रगती आणि यशाची तुमची वाटचाल सुरु होण्याची शक्यता आहे. या काळामध्ये नोकरदार लोकांच्या कामाचं कौतुक होऊन यावेळी प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात या राशातील लोकांची खूप प्रगती होऊ शकते.

Libra Yearly Horoscope 2024
Libra Yearly Horoscope 2024: तूळ राशीला लक्ष्मी कधी देणार प्रचंड धनलाभ? जाणून घ्या १२ महिन्यांचे राशीभविष्य
inspirational story kalpana-saroj
बाराव्या वर्षी लग्न, सासरच्यांकडून छळ; दोन रुपयांपासून कमाईला सुरुवात करणाऱ्या कल्पना सरोज ९०० कोटींच्या मालकीण बनल्या कशा?
shukra and guru conjection 2024 positive impact these zodiac sing aries tula zodiac
तब्बल १२ वर्षांनंतर शुक्र आणि गुरुचा संयोग; ‘या’ राशींना येणार सोन्याचे दिवस? प्रत्येक कामात यश मिळण्याची शक्यता
Kedar Rajyog
तब्बल ५०० वर्षांनी ‘केदार राजयोग’ बनल्याने ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? लक्ष्मी कृपेने बलाढ्य धनलाभ होण्याची शक्यता

(हे ही वाचा : वर्षाच्या अखेरिस ३ दुर्लभ योग घडल्याने ‘या’ राशींना नोकरीसह मिळणार प्रचंड पैसा? शनि-बुध कृपेने होऊ शकते धनवृष्टी )

मिथुन राशी

मिथुन राशींच्या लोकांच्या जीवनात सुख-समृद्धी वाढण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यापारात यश मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याशी निगडीत समस्या दूर होऊ शकतात. रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. करिअरमध्ये नव्या संधी मिळण्याची शक्यता आहे. अविवाहितांना जोडीदार मिळू शकतो. व्यावसायिकांना मोठा लाभ मिळू शकतो. घरात आनंदाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे.

कर्क राशी

सूर्याच्या राशी बदलामुळे कर्क राशीच्या लोकांना चांगले परिणाम दिसून येऊ शकतात. अचानक कुठूनही पैसा मिळू शकतो. या राशीच्या लोकांना करिअरमध्ये मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळू शकते. समाजात पद प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता आहे. नवीन वर्षात या राशीतील लोकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Surya gochar 2024 sun transit in aries these three zodiac signs bank balance to raise money marathi astrology pdb

First published on: 30-11-2023 at 16:24 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×