Surya Gochar 2025 : ग्रहांचा राजा सूर्य हा नवग्रहातील अत्यंत महत्त्वाचा ग्रह मानला जातो, जो दर महिन्यात राशीत परिवर्तन करत असतो. सूर्याच्या राशी परिवर्तनामुळे काही राशींच्या जीवनावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या परिणाम होणार आहे. त्यात सूर्यदेव १५ डिसेंबरपासून धनू राशीत प्रवेश करणार आहे आणि त्यामुळे धनू संक्रांती होणार आहे, तसेच खरमास सुरू होईल. सूर्य धनू राशीत जात असल्यामुळे काही राशींच्या लोकांचे नशीब उजळू शकते. चला जाणून घेऊ या जेव्हा सूर्य गुरूच्या राशीत प्रवेश करतो तेव्हा कोणत्या राशींचे भाग्य उजळू शकते…

द्रिक पंचांगानुसार १५ डिसेंबर २०२४ रोजी रात्री ९ वाजून ५६ मिनिटांनी सूर्य धनू राशीत प्रवेश करणार आहे. १४ जानेवारी २०२५ पर्यंत सूर्य या राशीत राहील.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

सूर्य गोचरमुळे ‘या’ राशी होणार मालामाल; नोकरी, व्यवसायातून कमावतील बक्कळ पैसा!

मेष

सूर्याचे राशी परिवर्तन मेष राशीसाठी फलदायी ठरू शकते. या काळात मेष राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. त्यांना सुख आणि समृद्धी मिळू शकेल. तुमचा अध्यात्माकडे अधिक कल वाढू शकतो. करिअरच्या क्षेत्रातही तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात. प्रवासाच्या संधी मिळू शकतात; पण यातून तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. व्यवसायातही लाभ होण्याची शक्यता आहे. धनप्राप्तीच्या मार्गात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. वैवाहिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास, तुमच्या जोडीदाराबरोबर तुमचा वेळ चांगला जाईल. आरोग्यही चांगले राहील.

सिंह

सूर्याचे राशी परिवर्तन सिंह राशीसाठी शुभ ठरू शकते. या काळात मुलांना भेडसावणाऱ्या समस्या आता संपू शकतात. अध्यात्माकडे तुमचा कल वाढू शकतो आणि त्यामुळे तुम्हाला प्रवासाच्या संधी मिळू शकतात. या काळात तुमचा कामाचा ताण थोडा जास्त असू शकतो; पण तुम्ही तुमच्या हुशारी आणि नियोजन यांच्या बळावर तो ताण कमी करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता. व्यवसायातही भरपूर फायदा मिळू शकतो. पैसे कमावण्याचे अनेक स्रोत उघडू शकतात. त्यासह तुम्ही पैशांची बचत करण्यातही यशस्वी होऊ शकता. तुमचे आरोग्य चांगले राहील.

Shani Budh Yuti 2025 : नवीन वर्षात सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींच्या मंडळींचे दार? शनी-बुधाच्या संयोगाने होऊ शकाल लखपती

वृश्चिक

सूर्य वृश्चिक राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर सिद्ध होऊ शकतो. या काळात वृश्चिक राशीचे लोक प्रवास आणि प्रोत्साहनाद्वारे भरपूर पैसे कमवू शकतात. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्कीच मिळू शकते. व्यवसायातही नफा मिळण्याची शक्यता आहे. त्यासह भागीदारीमध्ये केलेल्या व्यवसायात तुम्हाला पुरेसे पैसे कमवू शकता. आर्थिक स्थिती चांगली राहील. तुमच्या आयुष्यात प्रेम आणि आनंदाचे क्षण येऊ शकतात.

(टीप -वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader