Sun Transit In Tula: ग्रहांचा राजा सूर्य हा नऊ ग्रहांपैकी एक अत्यंत महत्त्वाचा ग्रह मानला जातो, जो दर महिन्याला आपली राशी बदलतो. सूर्याच्या राशीच्या बदलामुळे प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर परिणाम होऊ शकतो. सूर्य हा पिता आणि आत्म्याचा कारक मानला जातो. येत्या १३ तारखेला सूर्य आपली राशी बदलून शुक्राच्या तूळ राशीत प्रवेश करेल. शुक्राच्या राशीत आल्याने सूर्य अनेक राशीच्या लोकांसाठी चांगला सिद्ध होऊ शकतो. जाणून घेऊया सूर्य तूळ राशीत गेल्याने कोणत्या राशींना खूप फायदा होऊ शकतो…
द्रिक पंचांग नुसार, सूर्य १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ७:२७ वाजता तूळ राशीत प्रवेश करेल आणि १६ नोव्हेंबसर २०२५ पर्यंत या राशीत राहील.
मेष राशी
या राशीत सूर्य हा पाचव्या घराचा स्वामी असून सातव्या घरात प्रवेश करणार आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते तसेच भरपूर आर्थिक लाभही होऊ शकतो. आयुष्यात काहीतरी नवीन करण्याच्या दिशेने वाटचाल कराल. तसेच तुम्हाला कुटुंब आणि मित्रांकडून पूर्ण पाठिंबा मिळू शकतो. करिअरच्या क्षेत्रातही तुम्हाला बरेच फायदे मिळतील. वरिष्ठांच्या मदतीने तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकता. तसेच तुमच्या कामाचे कौतुकही होऊ शकते. व्यवसायातही लाभ होण्याची शक्यता आहे. भागीदारीत केलेल्या कामात भरपूर यश मिळू शकते. तसेच तुम्हाला भरपूर नफाही मिळेल. नशिबाने साथ दिल्याने तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकते. समाजात मान-सन्मान वाढू शकतो. आरोग्यही चांगले राहील.
हेही वाचा – Shukra Navratri 2024: सोन्यासारखे उजळेल करिअर, नवरात्रीत ‘या’ ४ राशींवर पैशांचा वर्षाव होणार!
वृषभ राशी
या राशीमध्ये सूर्य चौथ्या घराचा स्वामी असून सहाव्या घरात प्रवेश करत आहे. अशा परिस्थितीत या राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकतात. त्यामुळे प्रलंबित कामे पूर्ण करता येतील. आता तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ कामाच्या ठिकाणी मिळू शकेल. अशा परिस्थितीत पदोन्नतीसह पगार वाढू शकतो. तसेच व्यवसायातही भरपूर फायदा होईल. तुमच्या क्षमतेच्या जोरावर तुम्ही व्यवसायात भरपूर नफा कमवू शकता. आर्थिक स्थिती चांगली राहील. तुमच्या छोट्या छोट्या प्रयत्नांचा नक्कीच प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रभाव पडणार आहे. जोडीदारासह चांगला वेळ घालवू शकाल. नवीन नात्याची सुरुवात करू शकता. आरोग्यही चांगले राहील.
हेही वाचा –आज वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण! मेष ते मीन ‘या’ १२ राशींवर काय होणार परिणाम? जाणून घ्या
मिथुन राशी
या राशीमध्ये सूर्य तिसऱ्या घराचा स्वामी असून तूळ राशीत प्रवेश केल्यानंतर या राशीच्या पाचव्या भावात राहणार आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांनाही खूप फायदा होऊ शकतो. तुमचा अध्यात्माकडे अधिक कल असेल. अशा परिस्थितीत तुम्ही कोणत्याही धार्मिक कार्यक्रमाला किंवा ठिकाणी जाऊ शकता. किरणबद्दल बोलायचे झाले तर नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. तुम्ही यावर समाधानी दिसू शकता. तसेच तुम्हाला व्यवसायात नफाही मिळू शकतो. तुमच्या कामाचे कौतुक होईल. तसेच, तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून भरपूर नफा मिळवू शकता. लव्ह लाईफसुद्धा चांगली जाणार आहे. तुम्ही एकमेकांना चांगले समजून घ्याल. दीर्घकाळचा आजार आता बरा होऊ शकतो. कुटुंबासह चांगला वेळ घालवाल.