Surya Gochar 2025 : यश आणि प्रसिद्धीचा कारक असलेल्या सूर्य ग्रहाचे गोचर चंद्राच्या कर्क राशीमध्ये १६ जुलै २०२५ ला सायंकाळी ५ वाजून १७ मिनिटांनी होणार आहे. सूर्याचा कर्क राशीमध्ये प्रवेश करणे चार राशींच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. जाणून घेऊ या त्या चार राशी कोणत्या आहेत, ज्यांना सूर्याच्या गोचरपासून धन प्राप्ती, नोकरीमध्ये यश इत्यादी संधी प्राप्त होऊ शकतात.
मेष राशी (Aries Horoscope)
सूर्याते गोचर मेष राशच्या लोकांसाठी लाभदायक ठरू शकते. या लोकांना शुभ फळ प्राप्त होऊ शकते. या लोकांच्या जीवनात आनंदाचे क्षण दिसून येईल. नोकरी आणि व्यवसायात हे लोक खूप प्रगती करतील. या लोकांचे प्रेम संबंध दृढ होईल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. या लोकांसाठी नवीन काम सुरू करण्यासाठी ही योग्य वेळ असेल.
मिथुन राशी (Gemini Horoscope)
सूर्याचे गोचर मिथुन राशीच्या लोकांसाठी शुभ परिणाम देणारे ठरू शकतात. या लोकांना अपत्याकडून गोड बातमी मिळू शकते. घरात आनंदाचे वातावरण दिसून येईल. नोकरी आणि व्यवसायात यशाचे मार्ग उघडतील. या लोकांचे सर्वत्र कौतुक होईल. यांच्या कामाची प्रशंसा केली जाईल अचानक अडकलेले धन प्राप्त होऊ शकते. घरात मांगलिक कार्य होऊ शकतात. जोडीदाराविषयी प्रेम वाढेन. नातेसंबंध आणखी दृढ होईल.
सिंह राशी (Leo Horoscope)
सूर्याचे गोचर सिंह राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरू शकते. जमीन आणि वाहन खरेदी करू शकतात. करिअरमध्ये मोठ्या संधी मिळू सकते. पितृसंपत्ती प्राप्त होऊ शकते. वैवाहिक जीवात प्रेम वाढेन. भाऊ बहिणीमध्ये असलेले आर्थिक वाद संपुष्टात येईल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांमध्ये चांगले यश मिळू शकते.
कन्या राशी (Virgo Horoscope)
सूर्याचे गोचर कन्या राशीच्या लोकांना यश मिळवून देईल. या लोकांच्या धन संपत्तीमध्ये वृद्धी होऊ शकते. यांना नोकरी आणि व्यवसायात मोठा लाभ मिळू शकतो. यांची चांगली प्रगती होऊ शकते. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची मदत होईल. भौतिक सुख संपत्ती वाढेन आणि घरात सर्वांचे आरोग्य चांगले राहीन.