November Horoscope: सूर्याच्या राशीबदलाला ज्योतिषशास्त्रात विशेष महत्त्व दिले जाते. सूर्य जेव्हा जेव्हा राशी बदलतो, तेव्हा त्याचा प्रभाव मेष ते मीन या सर्व १२ राशींवर पडतो. सध्या सूर्य तुळ राशीत आहे. काही दिवसांत सूर्य राशी बदलून वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. ग्रहांचा राजा मानला जाणारा सूर्य सध्या राहूच्या स्वाती नक्षत्रात भ्रमण करत आहे.
हिंदू पंचांगानुसार, १६ नोव्हेंबर २०२६ रोजी संध्याकाळी सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करेल. त्यानंतर १६ डिसेंबर २०२६ पर्यंत सूर्य मंगळाच्या वृश्चिक राशीत राहील. सूर्याच्या या गोचरामुळे काही राशींचे नशीब उजळू शकते. जाणून घेऊया, वृश्चिक राशीत सूर्याच्या प्रवेशामुळे कोणत्या राशींना शुभ परिणाम मिळू शकतात.
१ महिन्यासाठी ८ राशींचे नशीब उजळणार! वृश्चिक राशीत सूर्याच्या गोचराचा शुभ प्रभाव
हिंदू पंचांगानुसार, सूर्याच्या वृश्चिक राशीतील गोचरामुळे सुमारे ८ राशींसाठी हा काळ लाभदायक ठरण्याची शक्यता आहे.
वृषभ राशी
सूर्याचा वृश्चिक राशीत प्रवेश वृषभ राशीच्या लोकांसाठी शुभ मानला जात आहे. या काळात नवीन काम सुरू करण्यासाठी चांगला काळ असेल. कामानिमित्त परदेश प्रवासाची संधी मिळू शकते. समाजात मान-सन्मान वाढेल.
मिथुन राशी
सूर्याचे हे गोचर मिथुन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. आपल्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाव्या लागतील. आर्थिक समृद्धी वाढेल.
कन्या राशी
सूर्याचे हे गोचर कन्या राशीच्या लोकांसाठी शुभ मानले जात आहे. व्यवसायात परदेशातील मोठी डील मिळू शकते. वैवाहिक जीवन आनंदी राहील.
तूळ राशी
सूर्याचे हे गोचर तूळ राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरू शकते. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. मात्र, खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
वृश्चिक राशी
सूर्याचा स्वतःच्या राशीत प्रवेश वृश्चिक राशीच्या लोकांसाठी उत्तम ठरू शकतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. एखादी चांगली बातमी मिळू शकते.
मकर राशी
सूर्याचे हे गोचर मकर राशीच्या लोकांसाठी खास मानले जात आहे. जोडीदारासोबत सुरू असलेल्या अडचणी हळूहळू दूर होतील. आर्थिक स्थितीतही सुधारणा होईल.
कुंभ राशी
सूर्याचे हे गोचर कुंभ राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरू शकते. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. संततीकडून आनंदाची बातमी मिळू शकते. व्यवसायातही प्रगती होईल.
मीन राशी
सूर्याचे हे गोचर मीन राशीच्या लोकांसाठी भाग्यवान ठरू शकते. रखडलेली कामे पूर्ण होऊ लागतील. आत्मविश्वास वाढेल.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्यातिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
