Surya Gochar: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजा सूर्य हा प्रभावशाली ग्रह मानला जातो. सूर्य ठराविक कालावधीनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. सध्या सूर्य कन्या राशीत आहे. ऑक्टोबर महिन्याच्या मध्यात सूर्य राशी बदलून तुळ राशीत प्रवेश करणार आहे. तुळ राशीत सूर्य नीचस्थ मानला जातो.

मात्र या राशीत आधीपासूनच शुक्र आणि बुध उपस्थित आहेत. त्यामुळे काही राशींसाठी सूर्याचे हे गोचर लाभदायक ठरू शकते, तर काही राशींना संमिश्र परिणाम मिळू शकतात. हे विश्लेषण चंद्र राशीनुसार करण्यात आले आहे. जाणून घ्या, सूर्य तूळ राशीत गेल्यानंतर कोणत्या राशींना फायदा होऊ शकतो.

वैदिक पंचांगानुसार, पित्याचा कारक मानला जाणारा सूर्य १७ ऑक्टोबर २०२६, शनिवारी संध्याकाळी ७:५७ वाजता कन्या राशीतून बाहेर पडून तुळ राशीत प्रवेश करेल.

सूर्य १६ नोव्हेंबर २०२६, सोमवारी संध्याकाळी ७:४८ वाजेपर्यंत तूळ राशीत राहील. त्यानंतर तो वृश्चिक राशीत प्रवेश करेल. तुळ राशीत आधीपासूनच शुक्र आणि बुध आहेत. त्यामुळे सूर्य, बुध आणि शुक्र यांच्या युतीमुळे शक्तिशाली त्रिग्रही योग तयार होणार आहे. तसेच शुक्रादित्य योग आणि बुधादित्य राजयोगही निर्माण होणार आहेत. विशेष म्हणजे शुक्र ६ नोव्हेंबरपर्यंत तुळ राशीत राहणार आहे.

सिंह राशी (Leo Zodiac)

सिंह राशीच्या लोकांसाठी सूर्याचे हे गोचर अनेक बाबतीत खास ठरू शकते. सूर्य या राशीच्या तिसऱ्या भावात प्रवेश करणार आहे. त्यामुळे तुमचे धाडस आणि मेहनत वाढू शकते. अनेक दिवसांपासून एखाद्या कामासाठी घेतलेले प्रयत्न यशस्वी होऊ शकतात. मात्र त्यासाठी थोडी अधिक मेहनत घ्यावी लागू शकते. नोकरी करणाऱ्यांसाठीही हा काळ चांगला राहू शकतो. तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळू शकते. पगारवाढ होण्याबरोबरच मान-सन्मान मिळण्याचीही शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांनाही चांगला फायदा होऊ शकतो. तुमच्या उत्तम संवाद कौशल्यामुळे एखादा मोठा प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे. मात्र विनाकारण राग करण्याचे टाळा. अन्यथा त्याचा तोटा होऊ शकतो.

मकर राशी (Capricorn Zodiac)

मकर राशीच्या लोकांसाठी सूर्याचे हे गोचर खूप शुभ ठरू शकते. नोकरी करणाऱ्यांना चांगला फायदा मिळू शकतो. मात्र कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे. तरीही पुढील काळात त्याचा चांगला लाभ मिळू शकतो. तुम्ही तुमच्या सर्व जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडाल. त्यामुळे कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा अधिक मजबूत होऊ शकते. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर समाधानी राहू शकतात आणि त्यांचे सहकार्यही मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठीही हा काळ चांगला राहू शकतो. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात. वरिष्ठांचे सहकार्य मिळाल्याने तुमचे ध्येय पूर्ण करण्यात तुम्हाला यश मिळू शकते.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)