Surya Gochar 15 May Horoscope: १५ मे रोजी सूर्यदेव वृषभ राशीत गोचर करणार आहेत. योगायोगाने दोन दिवसांनी अधिक मासही सुरू होणार आहे. अधिक मास १७ मे ते १७ जूनपर्यंत राहील. या संपूर्ण अधिक मासात सूर्य वृषभ राशीतच भ्रमण करणार आहेत. ज्योतिषतज्ज्ञ अरुणेष कुमार शर्मा यांच्या मते, सूर्याच्या वृषभ राशीत गोचरानंतर तीन राशींच्या लोकांनी थोडं सावध राहणं गरजेचं आहे. या राशींच्या आयुष्यात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढू शकतो, त्यामुळे अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणून या लोकांनी प्रत्येक काम काळजीपूर्वक करावं.
मिथुन राशी (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांनी आजूबाजूच्या वातावरणाकडे विशेष लक्ष द्यावं. तुमचे काही विरोधक सक्रिय होऊ शकतात, जे तुमच्या प्रतिमेला आणि कामांमध्ये मोठ्या अडचणी निर्माण करू शकतात. कामाच्या ठिकाणी लोकांवर जास्त विश्वास ठेवणं टाळा. मानसिक तणावामुळे कामाची गुणवत्ता आणि गती दोन्ही कमी होऊ शकतात. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर नाराज होऊ शकतात. या काळात कुटुंबातील एखादी व्यक्ती घरापासून दूर जाऊ शकते.
कन्या राशी (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठीही हा महिना फारसा चांगला दिसत नाही. भाऊ-बहिणींकडून काही त्रास होऊ शकतो, त्यामुळे तुमची चिंता वाढू शकते. धार्मिक प्रवास किंवा इतर कारणांमुळे खर्च वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे बजेटनुसार खर्च करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. पैशांची कमतरता असल्याने तुम्हाला कुठूनतरी कर्ज घ्यावं लागू शकतं आणि ते फेडणं सोपं जाणार नाही. आरोग्याच्या दृष्टीनेही काळ फारसा चांगला नाही. वडिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल.
तूळ राशी (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांनीही सूर्याच्या वृषभ राशीत प्रवेशानंतर थोडी सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. आरोग्याशी संबंधित समस्या त्रास देऊ शकतात. त्वचेचे आजार, पित्ताचा त्रास, ताप किंवा अशक्तपणा जाणवू शकतो. आर्थिक स्थितीतही मोठे चढ-उतार दिसू शकतात. उत्पन्न वाढवण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागू शकते. अचानक खर्च किंवा नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक बाबतीत काळजी घेणं आवश्यक आहे.
उपाय
दररोज सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करा. ‘ॐ सूर्याय नमः’ या मंत्राचा जप करा. पैशांशी संबंधित अडचणी दूर करण्यासाठी प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करा आणि त्यांना पांढऱ्या वस्तूंचा नैवेद्य अर्पण करा.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
