Surya Nakshatra Parivartan 2026: ज्योतिष्यशास्त्रानुसार, ग्रहांचा राजा सूर्य पिता, आत्मविश्वास, पद-प्रतिष्ठा यांचा कारक मानला जातो. ६ जूलै २०२६ ला सूर्य दुपारी१२.०९ वाजता सुर्याने गुरुचे स्वामित्व असलेल्या पुनर्वसू नक्षत्रात प्रवेश केला आहे. या नक्षत्रामध्ये सुर्य २० जुलै २०२६ पर्यंत राहील.पण सुर्य आणि गुरुमध्ये मैत्रीमुले हे गोच ६ राशींसाठी अत्यंत शुभ सिद्ध होईल. या लोकांना सुख, सन्मान, धन-समृद्धीमध्ये वाढ होईल.
मेष राशी (Aries)
सूर्याचे पुनर्वसू नक्षत्रामध्ये गोचर केल्याने मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल होऊ शकतो. आत्मविश्वास वाढेल आणि जीवनात नवी दिशा मिळले. आर्थिक स्थिती सुधारू शकते. या लोकांना नवी संधी मिळेल. जुन्या मित्रांची भेट होईल.
वृषभ राशी (Taurus)
सूर्याचा पुनर्वसू नक्षत्रातील प्रवेश वृषभ राशीसाठी अत्यंत शुभ ठरेल. एक विश्वासू सोबती अचानक मदतीसाठी पुढे येईल. कामाचे कौतुक होईल आणि आदर वाढेल. प्रगतीची चिन्हे आहेत. लोकांना कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्याचे मार्ग सापडू शकतात.
सिंह राशी(Leo)
सिंह राशीच्या व्यक्तींना सूर्याच्या नक्षत्रातील बदलामुळे फायदा होईल. कार्यालयात मोठी जबाबदारी मिळेल. दीर्घकाळ चाललेले वाद संपुष्टात येतील आणि चिंता दूर होतील. करिअरमध्ये जलद प्रगती होईल. वडिलांसोबतचे संबंध पूर्वीपेक्षा चांगले राहतील. व्यक्तिमत्त्व अधिक उजळेल.
कन्या राशी (Virgo)
सूर्याचा पुनर्वसू नक्षत्रातील प्रवेश कन्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल. मनात समाधान आणि शांती नांदेल. कौटुंबिक संबंधांमध्ये सुधारणा होण्याची चिन्हे आहेत. तुम्ही कामाच्या ठिकाणी उत्तम समन्वय साधू शकाल. शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला आहे.
धनु राशी (Sagittarius)
सूर्याच्या नक्षत्रातील बदलामुळे धनु राशीच्या लोकांचे भाग्य उजळेल. थांबलेली कामे मार्गी लागतील. जोडीदाराबरोबरचे संबध सुधारतील. कामात स्थिरता येण्याचे संकेत आहेत. मानसिक ताण दूर होईल. कष्टाचे फळ मिळेल. उत्पन्न आणि खर्चात संतुलन राहील. उत्साह वाढेल.
मीन राशी (Pisces)
सूर्याचे हे नक्षत्र गोचर मीन राशीच्या लोकांसाठी शुभ परिणाम देऊ शकते. आर्थिक बाबतीत, गोष्टी जातकांच्या बाजूने जाऊ शकतात. जीवनात सकारात्मक बदलांसाठी तयार रहा. नवीन मार्ग खुले होतील. करिअरमध्ये उत्तम संधी आहेत. जुने संबंध सुधारतील.
