Surya Grahan 2022 Do’s and Don’ts: सूर्यग्रहण ही एक अशी घटना आहे ज्याला विज्ञानापासून धर्म आणि ज्योतिषशास्त्रापर्यंत खूप महत्त्व आहे. २०२२ मधील पहिले सूर्यग्रहण ३० एप्रिल रोजी होणार आहे. यासोबतच शनिचरी अमावस्याही या दिवशी पडत आहे. त्यामुळे या ग्रहणाचे महत्त्व अनेक पटींनी वाढले आहे. आंशिक सूर्यग्रहण असल्यामुळे त्याचा सुतक कालावधी वैध राहणार नाही, परंतु यादरम्यान काही खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा ते जीवावर बेतू शकते. हे ग्रहण ३० एप्रिलच्या मध्यरात्री १२.१५ पासून सुरू होईल आणि पहाटे ०४.०८ पर्यंत राहील.

Shani Nakshtra transit will be lucky for these zodiac signs will get so much money and will become rich
Shani Nakshtra : सहा महिन्यापर्यंत शनिच्या कृपेमुळे या राशींना मिळणार बक्कळ पैसा, होऊ शकतात श्रीमंत
Vipreet Rajyog
विपरीत राजयोगामुळे या राशींना मिळेल छप्परफाड पैसा! उघडेल नशिबाचे दार
Shash Mahapurush Rajyog
३० वर्षांनी ‘शश राजयोग’ बनल्याने ‘या’ तीन राशी होणार प्रचंड श्रीमंत? शनिदेवाच्या कृपेने वर्षभर मिळू शकतो पैसाच पैसा
18th April Panchang & Rashi Bhavishya:
१८ एप्रिल पंचांग: तूळ, कर्कसह ‘या’ राशींना धनलाभासह मिळेल जोडीदाराची साथ; आजचा अभिजात मुहूर्त कधी?

ग्रहण काळात काय करावे ?

  • तुळशीची पाने अन्न आणि पाण्यात टाका, जेणेकरून ग्रहणाचा नकारात्मक प्रभाव त्यांच्यावर पडू नये आणि ग्रहणानंतर त्यांचे सेवन करता येईल.
  • घराचे मंदिर झाकून ठेवा. यादरम्यान मंदिरांचे दरवाजेही बंद ठेवले जातात.
  • ग्रहणकाळात जास्तीत जास्त वेळ देवपूजेत घालवावा.
  • ग्रहणानंतर स्नान करून दान करावे. विशेषत: सफाई कामगारांना दान करणे खूप चांगले मानले जाते.

आणखी वाचा : धनाचा दाता शुक्र आणि ज्ञान देणाऱ्या गुरुची मीन राशीत युती, या ३ राशींना धनलाभाची प्रबळ शक्यता

ग्रहण काळात हे काम करू नका

  • ग्रहण काळात नकारात्मक ऊर्जा वाढते, त्यामुळे यावेळी कोणतेही शुभ कार्य करू नये.
  • ग्रहण काळात सुईमध्ये धागा घालण्यास मनाई आहे.
  • सूर्यग्रहण काळात अन्न शिजवू नका, कापण्याचे आणि सोलण्याचे काम करू नका किंवा अन्न खाऊ नका.
  • विशेषत: गरोदर महिलांनी यावेळी चाकू-कात्री किंवा कोणतीही तीक्ष्ण वस्तू वापरू नये, या वस्तू हातात घेऊ नये.
  • ग्रहण काळात प्रवास करणे टाळावे.

गर्भवती महिलांनी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात :

  • सूर्यग्रहणाच्या वेळी, गर्भवती महिलांनी अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे कारण असे मानले जाते की ग्रहण काळात त्यांनी कधीही घराबाहेर पडू नये कारण यावेळी बाहेर पडणारी हानिकारक किरणे त्यांच्या आरोग्यास हानी पोहोचवू शकतात.
  • सूर्यग्रहण काळात गर्भवती महिलांनी कधीही तीक्ष्ण वस्तू वापरू नये. कारण असे केल्याने त्यांच्या बाळामध्ये विकृती निर्माण होऊ शकते असे मानले जाते. यावेळी त्यांनी कोणत्याही प्रकारचे शिवणकाम व भरतकाम करू नये. सूर्यग्रहण काळात गर्भवती महिलांनी भाजीपाला कापणे, कपडे शिवणे आणि तीक्ष्ण किंवा धारदार हत्यारे वापरणे टाळावे. यामुळे मुलामध्ये शारीरिक दोष निर्माण होऊ शकतात.
  • सूर्यग्रहणाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी गर्भवती महिलांनी जिभेवर तुळशीचे पान ठेवावे आणि हनुमान चालीसा , दुर्गा स्तुतीचे पठण करा.
    सूर्यग्रहण संपल्यानंतर गर्भवती महिलेने आंघोळ करणे आवश्यक आहे, अन्यथा तिच्या बाळाला त्वचेचे आजार होऊ शकतात.
    या दरम्यान गर्भवती महिलांनी मानसिक जप करावा. जन्मलेल्या बाळाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर याचा चांगला परिणाम होतो.

(टीप: इथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)