Premium

Grahan 2023: ऑक्टोबर महिन्यामध्ये लागणार दोन ग्रहण! जाणून घ्या तिथी, वेळ आणि सुतककाळ

Surya Grahan and Chandra Grahan: ऑक्टोबर महिन्यात सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण लागणार आहे.

Surya Grahan and Chandra Grahan
ऑक्टोबरमध्ये लागणार सुर्यग्रहण आणि चंद्रग्रहण; जाणून घ्या तारीख(फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Grahan 2023: यंदा एकूण चार ग्रहण लागणार होती, ज्यापैकी पहिले सूर्यग्रहण २० एप्रिल रोजी लागले, तर चंद्रग्रहण ५ मे रोजी रात्री लागले आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये आणखी दोन ग्रहण लागणार आहेत. क्वचितच घडणारा एक विशेष योगायोग म्हणूनही या खगोलीय घटनेचे वर्णन केले जात आहे. यंदाचा ऑक्टोबर महिना असा असणार आहे, ज्यामध्ये दोन ग्रहण लागणार आहेत. हे ग्रहण या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण आणि वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण असेल. या ग्रहणांची तारीख आणि वेळ सर्व काही जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑक्टोबरमध्ये लागणार सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण

वर्षातील दुसऱ्या सूर्यग्रहणाबद्दल सांगायचे तर, जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो तेव्हा सूर्यग्रहण होते. दुसरे सूर्यग्रहण १४ ऑक्टोबर, शनिवारी होणार आहे, जे एक कंकणाकृती पूर्ण सूर्यग्रहण असणार आहे आणि त्याला रिंग ऑफ फायरदेखील म्हटले जाऊ शकते.

हे कंकणाकृती सूर्यग्रहण उत्तर-पश्चिम युनायटेड स्टेट्स, मेक्सिको, मध्य अमेरिका आणि दक्षिण अमेरिका, पॅसिफिक, अटलांटिक आणि आर्क्टिक प्रदेशांसह अनेक भागांमधून पाहता येईल. याशिवाय, इतर पाश्चात्य देशांमधून सूर्यग्रहणाचा काही भाग पाहता येईल. अमेरिकन स्पेस एजन्सी नासाने हे सूर्यग्रहण पाहण्यासाठी डोळ्यांच्या संरक्षणासाठी विशेष चष्मा वापरण्याचा सल्ला दिला आहे. हे सूर्यग्रहण भारतातून पाहता येणार नाही. कारण हे ग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे धार्मिक कारणास्तव भारतात सुतक काळ वैध ठरणार नाही.

हेही वाचा – ३० ऑक्टोबरपासून सिंहसह ‘या’ राशींना मिळेल अपार धन? राहू अन् गुरुची अशुभ युती संपल्याने येऊ शकतात सुखाचे दिवस

२०२३ मधील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण २८-२९ ऑक्टोबरच्या रात्री होणार आहे. हे ग्रहण युरोप, आशिया, ऑस्ट्रेलियासह जगातील अनेक भागांतून पाहता येणार आहे. हे आंशिक चंद्रग्रहण असेल, ज्यामध्ये चंद्राच्या काही भागालाच ग्रहण लागणार आहे. जेव्हा पृथ्वी चंद्र आणि सूर्य यांच्यामध्ये जाते आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडते तेव्हा हे घडते. हे ग्रहण रविवार २९ ऑक्टोबर रोजी पहाटे १:०६ वाजता दिसेल आणि पहाटे २:२२ वाजता समाप्त होईल.

वर्षातील दुसरे चंद्रग्रहण भारतातून पाहिले जाऊ शकते, त्यामुळे त्याचा सुतक काळ धार्मिक आधारावर वैध असेल. नवी दिल्ली येथे २९ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री ०१:४४:०५ वाजता ग्रहण दिसेल.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Surya grahan 2023 chandra grahan 2023 time and date 2 eclipse in october know date time snk

First published on: 25-09-2023 at 17:47 IST
Next Story
मंगळ स्वराशीत प्रवेश करताच ‘या’ राशींचे नशीब पालटणार? अपार धनलाभ होण्याची मोठी शक्यता