Premium

सर्वपित्री अमावस्येला दूसरे सूर्यग्रहण ‘या’ राशींचे नशीब सोन्याहून चमकवणार? पितरांच्या कृपेने येऊ शकतात सुखाचे दिवस

पितरांच्या आशीर्वादाने काही राशींच्या जीवनात सुख-समृध्दीत वाढ होण्याची शक्यता आहे. पाहा कोणत्या आहेत ‘या’ भाग्यशाली राशी…

Surya Grahan 2023
पितरांची 'या' राशींवर कृपा (फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

पितृपक्ष म्हणजेच श्राद्धाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. पितृ पक्षादरम्यान, पितरांचे स्मरण करण्यासाठी श्राद्ध विधी केले जातात. गणपती बाप्पाला निरोप देताच पितृ पक्ष सुरू होईल. पौर्णिमा तिथीचे श्राद्ध २९ सप्टेंबरला आणि पितृ अमावस्या १४ ऑक्टोबरला असेल. म्हणजेच पितृ पक्ष २९ सप्टेंबरला सुरू होईल आणि १४ ऑक्टोबरला संपेल. १४ ऑक्टोबर २०२३ रोजी अश्विन अमावस्या म्हणजेच सर्वपित्री अमावस्या आणि याच दिवशी वर्षातील दुसरे सूर्यग्रहण असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवशी सूर्य ग्रहण असल्याने काही राशींच्या सुख-समृध्दीत वाढ होण्याची शक्यता आहे. पाहा कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुसरे सूर्य ग्रहण कधी लागणार?

भारतातील वर्षातील दुसरे सूर्य ग्रहण १४ ऑक्टोबर २०२३ रोजी शनिवारी रात्री ८ वाजून ३४ मिनिटांनी लागणार असून मध्यरात्री ०२ वाजून २५ मिनिटांनी समाप्त होईल.

‘या’ राशींना लागणार लॉटरी?

मिथुन राशी

मिथुन राशींच्या लोकांवर या काळात सुर्यदेवाची विशेष कृपा असू शकते. नोकरी-व्यवसायात मोठा लाभ होण्याची शक्यता असून या लोकांची प्रगती होऊ शकते. पैसे मिळवण्याचे नवीन मार्ग तयार होऊ शकता. याकाळात मिळालेल्या चांगल्या बातमीमुळे मन प्रसन्न होऊ शकतो.  कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळू शकते.

(हे ही वाचा : २ ऑक्टोबरपासून ‘या’ पाच राशींना मिळेल अपार धन? केतू-मंगळदेवाच्या युतीमुळे होऊ शकता लखपती )

सिंह राशी

सूर्य ग्रहण सिंह राशीच्या लोकांसाठी सुखाचे दिवस घेऊन येणारा ठरु शकतो. या काळात नोकरदारांना नवीन संधी मिळू शकतात. व्यावसायिकांना मोठा फायदा होऊन बँक बॅलन्स वाढण्याची शक्यता आहे. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात तुमचा आनंद कायम राहू शकतो. जे व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी हा काळ अतिशय शुभ ठरु शकतो.

तूळ राशी

तूळ राशीतील लोकांना या काळात पितरांचा आशीर्वाद मिळू शकतो. नवीन नोकरी किंवा व्यवसाय सुरू करू शकता. व्यवसायात भरपूर फायदा होण्याची शक्यता आहे. यावेळी पैसे गुंतवणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकते. भविष्यात तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो. ऑफिसमध्येही तुमच्या कामाचे कौतुक होऊन तुम्हाला चांगल्या कामाचे फळ नक्कीच मिळू शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Surya grahan 2023 solar eclipse on sarva pitru paksha 2023 these three zodic signs bank balance to raise money marathi astrology pdb

First published on: 27-09-2023 at 15:59 IST
Next Story
२ ऑक्टोबरपासून ‘या’ पाच राशींना मिळेल अपार धन? केतू-मंगळदेवाच्या युतीमुळे होऊ शकता लखपती