suryagrahan lucky zodiac sign : वैदिक कॅलेंडरनुसार, सूर्य आणि चंद्रग्रहण वेळोवेळी होतात, ज्याचा मानवी जीवनावर आणि जगावर परिणाम होतो. सूर्यग्रहण आज मंगळवार, १७ फेब्रुवारी रोजी धनिष्ठा नक्षत्रात होईल. हे ग्रहण कुंभ राशीत होईल. यावेळी मंगळ मावळण्याच्या स्थितीत (ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाची अस्त (मावळती) स्थिती म्हणजे जेव्हा मंगळ सूर्याच्या अत्यंत जवळ येतो). असणार आहे. आठव्या घरात असणारा मंगळ सामान्यतः तणाव किंवा तणावपूर्ण परिस्थिती दर्शवितो. पण, मंगळ मावळल्यावर त्याची तीव्रता कमी होते . परिणामी, हे ग्रहण सर्व राशींच्या लोकांवर नकळत परिणाम करणार आहे. चला ग्रहणाचा १२ राशींवर होणारा परिणाम आणि त्याची वेळ जाणून घेऊया…
सूर्यग्रहण किती वाजता होईल?
वैदिक कॅलेंडरनुसार, सूर्यग्रहण दुपारी ३ वाजून २६ मिनिटांनी सुरू होईल. त्याची मध्यान्ह संध्याकाळी ५ वाजून ४० वाजता आणि ग्रहण संध्याकाळी ७ वाजून ५७ मिनिटांनी संपेल. त्याचा एकूण कालावधी ४ तास ३२ मिनिटे असणार आहे.
१२ राशींवर सूर्यग्रहणाचा परिणाम
मेष, कन्या, वृश्चिक, धनु आणि मकर राशीसाठी सूर्यग्रहण शुभ ठरू शकते. या काळात आर्थिक परिस्थिती मजबूत होण्याची चिन्हे आहेत. तुमच्या शब्दांचा आणि परिश्रमांचाही तुम्हाला फायदा होईल. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील, नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल ठरेल, उत्पन्नात वाढ होण्याचे संकेत, बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते, व्यवसाय करणाऱ्यांनाही आर्थिक फायदा होऊ शकतो.
वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, तूळ, कुंभ आणि मीन राशींना नुकसान होऊ शकते. या काळात तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी, हुशारीने गुंतवणूक करावी. कौटुंबिक जीवनात समस्या उद्भवू शकतात; परिणामी या काळात तुम्हाला राग अनावर होईल. काही अनावश्यक खर्च देखील वाढू शकतात. म्हणून, खर्च करण्याआधी नियोजन करा.
भारतात सुतक काळ असेल का?
शास्त्रांनुसार, सूर्यग्रहणाचा सुतक काळ ग्रहण सुरू होण्याच्या १२ तास आधी सुरू होतो. म्हणून, १६ तारखेला भारतीय वेळेनुसार पहाटे ३ वाजून २६ वाजता सुतक काळ सुरू होईल. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. शास्त्रांनुसार, ग्रहणाचे परिणाम फक्त जिथे दिसते तिथेच जाणवतात. म्हणून, भारतात या ग्रहणासाठी सुतक काळ राहणार नाही. याचा अर्थ मंदिरे बंद राहणार नाहीत आणि खाणेपिणेही सामान्य राहील.
‘रिंग ऑफ फायर’
सूर्यग्रहणाच्या वेळी चंद्र सूर्याच्या समोर येतो आणि सूर्याचा सुमारे ९५ टक्के भाग झाकला जातो. त्यामुळे सूर्य पूर्ण दिसत नाही. फक्त सूर्याचा बाहेरील कडा थोडा चमकत राहतो. जेव्हा ही अवस्था होते तेव्हा आकाशात सूर्याभोवती आगेसारखी चमकणारी गोल अंगठी दिसते. म्हणून याला ‘रिंग ऑफ फायर’ असे म्हणतात. हा सुंदर नजारा साधारण २ मिनिटे २१ सेकंद इतका वेळ दिसणार आहे.

