Horoscope Today 12 August 2026 In Marathi : आज १२ ऑगस्ट २०२६ रोजी शुक्ल पक्षातील आषाढ महिन्यातील अमावस्या तिथी रात्री ११ वाजून ७ मिनिटांपर्यंत असणार आहे. सकाळी ८ वाजता पुष्य नक्षत्र जागृत होईल आणि दुपारी ३ वाजून २६ मिनिटांपर्यंत व्यतिपात योग जागृत असणार आहे. राहू काळ १२ वाजून २६ मिनिटांनी सुरु होईल ते २ वाजून ५ मिनिटांपर्यंत असणार आहे. आज दीप अमावस्या आणि सूर्यग्रहण असणार आहे. तर याचा परिणाम तुमच्या कुंडलीवर कसा होणार घेऊ चला जाणून घेऊ.

आजचे पंचांग व राशिभविष्य, ११ ऑगस्ट २०२६ (Dainik Rashi Bhavishya 11 August 2026 In Marathi)

दैनिक मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)

कार्यक्षेत्रात एखादे परिवर्तन घडून येईल. संवेदनशीलता ठेवावी लागेल. उष्णतेचा त्रास जाणवेल. पोटाची तक्रार जाणवू शकेल. आजचा दिवस परोपकार करण्यात जाईल.

दैनिक वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)

निर्णय ऐनवेळी बदलावे लागू शकतात. डोळ्याचे विकार संभवतात. मनातील इच्छा पूर्णत्वास जाईल. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. दिवस गप्पा व मौजमजेत जाईल.

दैनिक मिथुन राशीचे राशिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)

टीका कारांकडे दुर्लक्ष करावे. आपल्या जवळील आनंद लक्षात घ्यावा. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. मनोबल वाढीस लागेल. वाहन चालवताना काळजी घ्यावी.

दैनिक कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)

निष्कारण वादंग नको. मनातील गोष्टी उघडपणे बोलणे टाळाल. घरगुती जबाबदारीत वाढ होईल. कामाचा ताण जाणवेल. घाईने निर्णय घेऊ नयेत.

दैनिक सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)

मनातील स्वप्न साकार होईल. आपले मत स्पष्टपणे मांडाल. मुलांबाबतच्या जबाबदार्‍या पार पाडाल. राजकीय व्यक्तींना उत्तम लाभ मिळतील. कौटुंबिक वातावरण खेळकर राहील.

दैनिक कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)

दिवस आनंदात जाईल. आपल्या मनाप्रमाणे गोष्टी कराल. परस्पर संवादातून सुखद बदल होतील. विरोधक नरम भूमिका घेतील. कलेतील नवीन गोष्टी शिकायला मिळतील.

दैनिक तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)

ज्येष्ठ मंडळींचा आशीर्वाद लाभेल. मनातील चलबिचलता काढून टाकावी. जोडीदाराच्या मताला प्राधान्य द्यावे लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे. दिनक्रम व्यस्त राहील.

दैनिक वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)

व्यावसायिक स्तरावर अनुकूल घटना घडतील. मित्रांचे सहकार्य लाभेल. प्रापंचिक ताण कमी होईल. प्रिय व्यक्तीच्या भेटीचे योग. कौटुंबिक वातावरण चांगले राहील.

दैनिक धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)

जिद्द सोडून चालणार नाही. परिस्थितीशी जमवून घ्यावे लागेल. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल. कौटुंबिक कामात अधिक वेळ जाईल. समोरील गोष्टींकडे सकारात्मकतेने पहावे.

दैनिक मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)

मनावर कोणताही दबाव न आणता वागावे. निर्णयाची कारणमीमांसा कराल. आपल्या मतावर अडून राहाल. धार्मिक गोष्टीमध्ये जास्त लक्ष घालावे. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे.

दैनिक कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)

समोरच्याचे मत खोडून काढाल. ठाम भूमिका घ्याल. हातातील अधिकाराचा वापर कराल. अचानक धनलाभ संभवतो. अति काळजी करण्यात वेळ वाया घालवू नका.

दैनिक मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)

आवडी-निवडी बाबत आग्रही राहाल. फार चिडचिड करू नका. कौटुंबिक वातावरण खेळकर ठेवावे. मानसिक शांतता लाभेल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर