Surya Guru Kendra Drishti Yog 2026: एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात एक महत्त्वपूर्ण ग्रहस्थिती निर्माण होत आहे, ज्याचा परिणाम अनेक राशींच्या लोकांवर होऊ शकतो. ९ एप्रिल २०२६ रोजी सूर्य आणि गुरू यांच्यात विशेष युती होईल, ज्याला केंद्र दृष्टी योग, असे ओळखले जाते. या योगामुळे काही राशींच्या लोकांपुढे अडचणींचा डोंगर वाढू शकतो. सूर्य आत्मविश्वास, सामर्थ्य व अहंकाराचे प्रतिनिधित्व करतो; तर गुरू ज्ञान आणि आकलनाचे प्रतिनिधित्व करतो. जेव्हा हे दोन्ही ग्रह समोरासमोर येतात तेव्हा हा नकारात्मक योग तयार होतो. त्यामुळे काही राशींच्या लोकांना निर्णय घेताना अडचणी येतात. संघर्षाचा सामना करावा लागतो. पण, नेमक्या कोणत्या राशींच्या लोकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, त्याविषयी जाणून घेऊ…

मेष

केंद्र दृष्टी योग मेष राशीच्या लोकांसाछी संमिश्र परिणाम देईल. या काळात तुमच्या रागावर तुमचे नियंत्रण राहणार नाही. वरिष्ठ व्यक्ती आणि घरातील वडीलधाऱ्यांशी वाद होण्याची शक्यता आहे. सरकारी कामात किंवा कागदपत्रे पूर्ण करण्यात अडचणी येऊ शकतात. तुम्ही कोणत्याही कागदपत्रांवर सही करण्याआधी ती काळजीपूर्वक वाचा. घाईने निर्णय घेणे घातक ठरू शकते.

वृषभ

या काळात वृषभ राशीच्या लोकांना पैशांच्या बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. खर्च अचानक वाढू शकतात. त्यामुळे तुमचे महिन्याचे बजेट बिघडेल. जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल, तर आता थांबणे उचित आहे. कारण- नुकसान होण्याची शक्यता आहे. काही कामे शेवटच्या क्षणी अडकू शकतात आणि त्यामुळे त्रास होऊ शकतो.

सिंह

हा योग सिंह राशीच्या लोकांसाठी प्रतिमा आणि करिअरवर परिणाम करणारा ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या शब्दांचा चुकीचा अर्थ लावला जाऊ शकतो. घाईने निर्णय घेतल्यास अडचणी वाढतील. कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. या काळात आपला मुद्दा शांतपणे मांडणे महत्त्वाचे आहे. अनावश्यक वाद टाळा.

वृश्चिक

हा काळ वृश्चिक राशीच्या लोकांसाठी मानसिकदृष्ट्या थोडा त्रासदायक ठरू शकतो. तणाव वाढू शकतो आणि त्याचा तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. घरात मालमत्ता आणि स्थावर मालमत्तेसंदर्भात वाद होण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना काळजी घ्या. स्वत:साठी वेळ काढा आणि ध्यान, योगा करा. त्यामुळे आराम मिळू शकतो.

कुंभ

हा काळ कुंभ राशीच्या लोकांसाठी असुरक्षिततेचा असल्याने आर्थिक चिंता वाढू शकतात. त्यामुळे बचतीवर नुकसानदायी परिणाम होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी दबाव वाढू शकतो आणि कामात मन लागणार नाही. त्या काळात तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करू शकता; परंतु तसे करणे योग्य ठरणार नाही. तसेच भावंडांसह नातेसंबंधात काहीसे दुरावे येऊ शकतात.

(टीप- वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे. लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)