June Graha Gochar 2026: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक महिन्यात ग्रहांचे राशी परिवर्तन, नक्षत्र परिवर्तन होते. ज्याचा प्रभाव १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींवर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. सध्या २०२६ मधील मे महिना सुरू असून लवकरच जून महिन्याची सुरूवात होईल. या महिन्यामध्ये गुरू, शुक्र, सूर्य, मंगळ आणि बुध आपल्या चालीत बदल करतील.
पंचांगानुसार, गुरू ग्रह ०२ जून रोजी मध्यरात्री ०२ वाजून २५ मिनिटांनी कर्क राशीत गोचर करेल. तसेच शुक्र ०८ जून २०२६ रोजी संध्याकाळी ०५ वाजून ४७ मिनिटांनी कर्क राशीत गोचर करेल. त्यानंतर सूर्यदेव १५ जून २०२६ रोजी मिथुन राशीत प्रवेश करेल व मंगळ ग्रह २१ जून २०२६ रोजी मध्यरात्री १२ वाजून ०७ मिनिटांनी वृषभ राशीत प्रवेश करतील. तसेच बुध २२ जून २०२६ रोजी दुपारी ०३ वाजू ४१ मिनिटांनी कर्क राशीत प्रवेश करेल.
जून महिना ‘या’ राशींना करोडपती बनवणार
मेष (Mesh Rashi)
जून महिन्यात मेष राशीच्या लोकांचा भरपूर आत्मविश्वास वाढेल. या काळात ग्रहांची स्थिती तुमच्या बाजूने असेल. आर्थिकदृष्ट्या काही सकारात्मक हालचाली झाल्याचे दिसू शकते. घरगुती वातावरण प्रसन्न राहील आणि काहींना कौटुंबिक आनंदाचे प्रसंगही लाभतील. हा काळ स्वतःला नवी ऊर्जा देणारा, आत्मविश्वास वाढविणारा ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. बराच काळ अडकलेले प्रकल्प आता गती घेतील.
मिथुन (Mithun Rashi)
जून महिना हा मिथुन राशीसाठी खूप शुभ काळ ठरू शकतो, या राशीच्या व्यक्तींना मोठा लाभ देऊ शकते. समाजात पद-प्रतिष्ठा वाढेल. भाग्य अधिक मजबूत होईल आणि लोकांचा विश्वास वाढेल. नातेसंबंधात गोडवा येईल; आर्थिक स्थिती सुधारेल, काहींसाठी नवीन कमाईचे मार्गही खुलतील. एकंदरीत, या राशीच्या लोकांसाठी हा महिना नाव, ओळख आणि प्रतिष्ठा वाढवणारा ठरू शकतो.
कर्क (Kark Rashi)
कर्क राशीच्या लोकांसाठी देखील हा काळ खूप अनुकूल सिद्ध होईल. हा महिना सकारात्मक बदलांचा काळ ठरू शकतो. करिअरमध्ये मोठा निर्णय तुमच्या फायद्याचा ठरू शकतो. दीर्घकाळ चाललेल्या प्रयत्नांना आता यशाची साथ मिळू शकते. हा काळ तुमचं व्यक्तिमत्त्व अधिक मजबूत करणारा आणि भविष्याबद्दल आत्मविश्वास देणारा ठरू शकतो. मोठा धनलाभ या काळात होऊ शकतो. कौटुंबिक वातावरण स्थिर राहील आणि पालकांचा पाठिंबा मिळेल.
कन्या (Kanya Rashi)
हा काळ कन्या राशीसाठी खूप फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती होईल. आकस्मिक धनलाभ होईल. करिअरमध्ये चांगला बदल पाहायला मिळेल; तसेच अडकलेले पैसे परत मिळतील. अडकलेली कामेही पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. आरोग्याच्या समस्याही नाहीशा होतील. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील.
वृश्चिक (Vruschik Rashi)
वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ खूप अनुकूल असेल. धन-संपत्तीत प्रचंड वाढ होईल. या लोकांच्या आयुष्यात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. त्यामुळे आजपर्यंत जे अशक्य वाटत होते, ते शक्य करून दाखवाल. गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
