Surya Guru Pushya Nakshatra Yuti 2026 Impact : ग्रह ज्याप्रमाणे राशई परिवर्तन करतात अगदी त्याचप्रमाणे ग्रह नक्षत्र बदल देखील करतात, ग्रहांचा हा नक्षत्र बदल प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर शुभ- अशुभ परिणाम करत असतो. द्रिक पंचांगानुसार, गुरू १९ जुलै २०२६ रोजी पुष्य नक्षत्रात प्रवेश करणार आहे. यानंतर दुसऱ्याच दिवशी २० जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजून ३३ मिनिटांनी सूर्य देव पुष्य नक्षत्रात प्रवेश करतील. यामुळे पुष्य नक्षत्रात सूर्य आणि गुरूचा महासंयोग घडून येईल जो काही राशींसाठी फलदायी ठरेल.
गुरू १९ ऑगस्ट २०२६ पर्यंत पुष्य नक्षत्रात राहतील, तर सूर्य देव ३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:२९ वाजेपर्यंत पुष्य नक्षत्रात असतील. सूर्य गुरूची ही युती २० जुलै २०२६ ते ३ ऑगस्ट २०२६ या काळात पुष्य नक्षत्रात सक्रिय राहील. हा काळ ५ राशींच्या लोकांसाठी करिअरमधील प्रगती, धनलाभ आणि नात्यांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणारा ठरेल.
१३ दिवस ‘या’ ५ राशींसाठी ठरणार अत्यंत शुभ
कर्क (Kark Rahi)
कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ मान-सन्मान आणि करिअरमध्ये नवीन ओळख मिळवून देणारा ठरू शकतो. तुम्ही योग्य वेळी संधीचा फायदा घेतल्यास मोठ्या फायद्यात राहाल.
कन्या ( Kanya Rashi)
कन्या राशीच्या व्यक्तींच्या उत्पन्नात (Income) वाढ होईल. तुमची एखादी मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते. कामात अजिबात निष्काळजीपणा करू नका आणि प्रगतीसाठी उपलब्ध नवीन संधींवर पूर्ण लक्ष ठेवा.
वृश्चिक (Vrishchik Rashi)
वृश्चिक राशीच्या लोकांना या काळात भाग्याची उत्तम साथ लाभेल. ज्यामुळे तुम्ही महत्त्वाची कामे यशस्वीरित्या पूर्ण करू शकाल. उत्पन्नात वाढ झाल्याने काही जुने प्रश्न सुटू शकतात.
धनु (Dhanu Rashi)
धनु राशीच्या लोकांना सूर्य-गुरूच्या युतीमुळे अचानक धनलाभ होऊ शकतो. अडकलेला पैसा परत मिळण्याचे संकेत आहेत. या पैशांची गुंतवणूक करणे भविष्यात मोठा परतावा देऊ शकते.
मीन (Meen Rashi)
मीन राशीच्या लोकांसाठी पुष्य नक्षत्रातील सूर्य-गुरूची युती अत्यंत फायदेशीर ठरेल. मीन राशीचा स्वामी गुरू ग्रह आहे. हे १३ दिवस तुम्हाला प्रेम, विवाह, अपत्य आणि शिक्षणाशी संबंधित आनंदाची बातमी देऊ शकतात.
