Surya ketu yuti 2024 : ग्रहाचे राजा सूर्य एका ठराविक कालावधीनंतर राशी परिवर्तन करतात आणि त्यांच्या राशी परिवर्तनाचा थेट परिणाम राशिचक्रातील १२ राशींवर होतो. सूर्य देव प्रत्येक महिन्याला राशी परिवर्तन करतात. अशात सू्र्य सप्टेंबर महिन्यामध्ये कन्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे. कन्या राशीमध्ये आधीपासून केतू ग्रह विराजमान आहे. अशात दोन्ही ग्रहाची युती निर्माण होईल.

सूर्य देव १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजून ५२ मिनिटांनी सिंह राशीमधून बाहेर पडणार आणि कन्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे. सूर्य आणि केतू यांची युती एक महिना दिसून येईल. सूर्याला आत्मा, मान सन्मान आणि सुख समृद्धीचा कारक मानले जाते तर केतूला अध्यात्म, मोक्ष आणि समाधानाचा कारक मानले जाते. केतु आणि सूर्य जवळपास १८ वर्षांनी एकत्र येत असल्यामुळे याचा फायदा राशिचक्रातील काही राशींना होईल. जाणून घेऊ या त्या राशी कोणत्या?

Shani Rashi Parivartan 2025
शनिदेव देणार पैसाच पैसा! २०२५ मध्ये शनि महाराज ‘या’ राशींच्या व्यक्तींना करणार लखपती? स्थान बदलत कुणाला देतील सोन्यासारखं आयुष्य?
2nd October Rashi Bhavishya & Panchang
२ ऑक्टोबर पंचांग: सर्वपित्री अमावस्या कोणासाठी ठरणार शुभ?…
Rahu transit 2024 in marathi
वैवाहिक जीवनात गोडी अन् आर्थिक नफा! शनिच्या नक्षत्रात राहूचे संक्रमण; ‘या’ राशींसाठी ठरणार लाभदायक
01 September Panchang Rashi Bhavishya astrology daily bhavishyafal today horoscope god shiv shankar bless in marathi
१ सप्टेंबर पंचांग: महिन्याच्या पहिल्याच दिवशी ‘या’ राशींवर होणार शिवशंकराची कृपा; पद, प्रतिष्ठा अन् संपत्ती होईल वाढ; वाचा तुमचे भविष्य
pitru paksha 2024 dates know rituals puja vidhi and importance of the day and significance of shraddh paksha in marathi
Pitru Paksha 2024 : या वर्षी पितृपक्ष कधी आहे? जाणून घ्या तिथीनुसार प्रारंभ आणि समाप्तीची तारीख
2nd September Panchang & Marathi Rashi Bhavishya
२ सप्टेंबर पंचांग: श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी कोणाचं भाग्य उजळणार? शिवयोग १२ पैकी ‘या’ पाच राशींच्या नशिबात प्रेम, धन, सुख देणार; वाचा तुमचे भविष्य
Surya Gochar 2024 | sun transit in kanya rashi
Surya Gochar 2024 : सूर्यदेवाच्या कृपेने मिळणार पैसाच पैसा! १६ सप्टेंबरपासून ‘या’ तीन राशींचे नशीब चमकणार
Budh gochar 2024 mercury transit in tula horoscope
पैसाच पैसा! बुधाच्या तूळ राशीतील संक्रमणामुळे ‘या’ तीन राशींचे चमकणार नशीब; नोकरी, व्यवसायातून मिळू शकतो आर्थिक फायदा

वृश्चिक राशी

वृश्चिक राशीमध्ये सूर्य अकराव्या स्थानावर प्रवेश करणार. त्यामुळे सूर्य आणि केतू यांची युती या राशीमध्येच होणार आहे. या राशीच्या लोकांचे अडकलेली कामे मार्गी लागतील. यांचे मन अध्यात्माकडे वळणार. हे लोक धार्मिक कार्यात सहभागी होतील. या लोकांची आर्थिक स्थिती सुधारू शकते. अडकलेला पैसा परत मिळू शकतो. हे लोक त्यांच्या बहीण भावांबरोबर चांगला वेळ घालवू शकतात. या लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण होणार तसेच हे लोक मित्रांबरोबर चांगला वेळ घालवू शकतील. या लोकांचा समाजात मान सन्मान वाढेन.

हेही वाचा : १३ सप्टेंबरपासून हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार ‘या’ राशींच्या व्यक्तींचे नशीब? सूर्यदेवाची शक्ती वाढताच लक्ष्मी कुणाच्या दारी येणार?

मकर राशी

या राशीच्या नवव्या स्थानावर सूर्य आणि केतू आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना नशीबाची साथ मिळेन. यांना अडकलेला पैसा परत मिळू शकतो तसेच अध्यात्माकडे हे लोक वळतील. या लोकांची समाजात प्रतिष्ठा वाढेल. हे लोक कुटुंबाबरोबर धार्मिक स्थळी जाऊ शकता. नशीबाची साथ मिळाल्यामुळे या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. हे लोक या दरम्यान मोठा निर्णय घेऊ शकतात. त्यांना आई वडीलांचे सहकार्य लाभेल.

तुळ राशी

या राशीमध्ये सूर्य बाराव्या स्थानावर आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांवर सूर्य देवाची विशेष कृपा दिसून येईल. या लोकांची आर्थिक स्थिती उत्तम राहीन. यांना पैसा कमावण्याचे नवीन स्त्रोत दिसून येईल. या लोकांना अनेक नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेन. जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवू शकतील. हे लोक अध्यात्माकडे वळतील. समाजात या लोकांचा मान सन्मान वाढेल. या राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढू शकतो ज्यामुळे ते त्यांचे ध्येय पूर्ण करण्यात यशस्वी होतील. भविष्यात त्यांना धनलाभ सुद्धा होऊ शकतो.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)