Sun Nakshatra Transit 2026: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे काही निश्चित कालावधीनंतर राशी परिवर्तन होते; ज्याचा प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मा आणि पित्याचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य मजबूत असतो, त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर यश, सुख, पद-प्रतिष्ठा, मान-सन्मान प्राप्त होतो. इतर ग्रहांप्रमाणेच सूर्यदेखील ठराविक काळानंतर राशी परिवर्तन करतो. सूर्याच्या परिवर्तनामुळे १२ राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात विविध बदल आपल्याला पाहायला मिळतात.

पंचागानुसार, सूर्य सध्या कुंभ राशीत विराजमान असून तो शततारका नक्षत्रात विराजमान आहे. सूर्याचे स्वराशी किंवा स्वतःचे स्वामीत्व असलेल्या नक्षत्रातील गोचर नेहमीच खास मानले जाते. दरम्यान, ११ मे २०२६ रोजी संध्याकाळी ०७ वाजून ३७ मिनिटांनी सूर्यदेव कृत्तिका नक्षत्रात प्रवेश करतील. कृत्तिका नक्षत्राचा स्वामी सूर्य आहे. त्यामुळे हे गोचर नक्कीच काही राशीच्या लोकांसाठी लाभदायक मानले जाते.

सूर्याचे नक्षत्र गोचर ‘या’ राशींना मालामाल करणार

सिंह (Singh Rashi)

सिंह राशीच्या व्यक्तींना सूर्याचे नक्षत्र परिवर्तन खूप लाभदायी असेल. हे नक्षत्र परिवर्तन तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. निर्यात आणि आयात व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. या काळात मुलांकडून आनंदी वार्ता येतील. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल आणि तुम्ही जमीन आणि वाहन खरेदीच्या दिशेने वाटचाल कराल. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळेल.

वृषभ (Vrushabh Rashi)

वृषभ राशीच्या व्यक्तींना सूर्याचे कृत्तिका नक्षत्रातील प्रवेश अत्यंत शुभ सिद्ध होईल. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात प्रचंड यश मिळेल आणि उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. तुमचा मान-सन्मान वाढेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. तसेच, बेरोजगार लोकांना यावेळी नवीन नोकरी मिळू शकते. त्याचबरोबर नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकते. तसेच, यावेळी, तुमच्या वडिलांबरोबरच्या नातेसंबंधात सुधारणा होईल.

धनु (Dhanu Rashi)

धनु राशीच्या व्यक्तींसाठी सूर्याचे नक्षत्र गोचर अत्यंत लाभदायक ठरेल. या काळात तुमच्या सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. नोकरीत बढती मिळेल व स्थलांतरही होऊ शकते. व्यवसाय करणाऱ्यांना मनासारखे यश मिळेल. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. आरोग्य चांगले राहील. देवधर्म कराल व तीर्थक्षेत्रांना आवर्जून भेट द्याल. आयुष्य खूप सुंदर आणि सोपे होईल. वैवाहिक जीवनात गोडवा निर्माण होईल. दूरचे प्रवास घडतील. कुटुंबात शुभकार्य होईल.

मीन (Meen Rashi)

ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याचे नक्षत्र परिवर्तन मीन राशीच्या व्यक्तींना विशेष लाभदायी असेल. या राशी परिवर्तनामुळे आकस्मिक धनलाभ होतील. बँक बॅलन्समध्ये झपाट्याने वाढ होईल. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. अनेक भौतिक सुखे प्राप्त होतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)