Trigrahi Yog In Mesh Rashi 2026: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन होते. ग्रहांच्या या राशी परिवर्तनामुळे अनेकदा एकाच राशीत दोन किंवा त्याहून अधिक ग्रह प्रवेश करतात, ज्यामुळे ग्रहांची युती निर्माण होते. या युतीचा अनेकदा शुभ तर अनेकदा अशुभ प्रभाव देखील पडतो. पंचांगानुसार १४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ०९ वाजून ३८ मिनिटांनी सूर्यदेव संपूर्ण १२ राशींचे राशीचक्र पूर्ण करून एक वर्षानंतर पुन्हा मेष राशीत प्रवेश करतील. त्यानंतर ३० एप्रिल २०२६ रोजी पहाटे ०६ वाजून ५५ मिनिटांनी बुध ग्रहदेखील मेष राशीत प्रवेश करेल. त्यानंतर ११ मे २०२६ रोजी दुपारी १२ वाजून ४७ मिनिटांनी मंगळ ग्रहदेखील याच राशीत प्रवेश करेल. मेष राशीत तीन ग्रह एकत्र आल्याने सूर्य, बुध आणि मंगळाचा त्रिग्रही योग निर्माण होईल. हा योग १२ पैकी काही राशींसाठी नक्कीच लाभदायक ठरू शकतो.

त्रिग्रही योग देणार पदोपदी भरपूर यश-कीर्ती

सिंह (Singh Rashi)

त्रिग्रही योग मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. या काळात नोकरीत हवे तसे यश मिळवाल. मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. या काळात आई-वडील आणि तुमच्या गुरूंचा आर्शीवाद तुमच्या पाठीशी असेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी सहकार्यांकडून मदत मिळेल. अचानक धनलाभ होईल. शत्रूंवर विजय मिळवाल.तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल. पद-प्रतिष्ठेत वाढ होईल. जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध अधिक गोड होतील.

कन्या (Kanya Rashi)

कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा योग अत्यंत लाभदायी सिद्ध होईल. त्यामुळे अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आकस्मिक धनलाभ होईल. मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. या काळात आई-वडील आणि तुमच्या गुरूंचा आर्शीवाद तुमच्या पाठीशी असेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी सहकार्यांकडून मदत मिळेल. अचानक धनलाभ होईल. वैवाहिक जीवन सुखमय होईल. आयुष्यात सुख-शांती निर्माण होईल.

मेष (Mesh Rashi)

मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा त्रिग्रही योग अतिशय खास असेल. कारण याच राशीत हा योग निर्माण होत आहे. त्रिग्रही योगाच्या प्रभावाने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. बँक बॅलन्सही झपाट्याने वाढेल. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. समाजात प्रसिद्धी मिळेल व मानसन्मान होईल. परदेशी जाणाऱ्यांचे स्वप्न पूर्ण होईल. प्रेमसंबंध अधिक मजबूत होतील. करिअरमध्ये भरपूर यश मिळेल.

कर्क (Kark Rashi)

त्रिग्रही योग कर्क राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. कुटुंबीयांसोबत फिरायला जाल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)